AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : मजबूत माणसाचेही हात थरथरले! नवजात बाळाला पहिल्यांदाच कुशीत घेतलं अन् बाबांचे हात थरथरू लागले; हृदयस्पर्शी…

आई जितकी बाळाची वाट त्याचे बाबा देखील पाहत असतात. वडिलांसाठीही पहिल्यांदा आपल्या बाळाला हातात घेणं हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो तुमच्या मनाला स्पर्शून झाली.

Video : मजबूत माणसाचेही हात थरथरले! नवजात बाळाला पहिल्यांदाच कुशीत घेतलं अन् बाबांचे हात थरथरू लागले; हृदयस्पर्शी...
viral videoImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 22, 2026 | 2:29 PM
Share

नवजात बाळाला पहिल्यांदाच हातात घेताच वडिलांचे हात थरथरले! बाळाला कुशीत घेण्याचा तो क्षण पाहून नेटकरीही

घरात बाळाचं आगमन होणारं म्हटलं की संपूर्ण कुटुंब आनंदात असतं. आईसाठी नऊ महिन्यांचा प्रवास संपून बाळाला पाहण्याचा क्षण खास असतो. तितकीच बाळाची वाट त्याचे बाबा देखील पाहत असतात. वडिलांसाठीही पहिल्यांदा आपल्या बाळाला हातात घेणं हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो. पण हा क्षण जितका आनंदाचा असतो. तितकीच मनात धाकधूकही असते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वडिलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपल्या नवजात बाळाला पहिल्यांदाच हातात घेताना त्यांच्या हातांना अक्षरक्ष: कंपन सुटते. त्यांचा हा क्षण पाहून अनेकजण भारावून गेले आहेत.

बाळाला हातात घेताना वडिलांची घाबरगुंडी

व्हायरल व्हिडिओमध्ये रूग्णालयातील एक दृश्य दिसतं.नर्स नवजात बाळाला त्याच्या वडिलांच्या हातात देण्यासाठी पुढे येते. बाळाला पाहताच वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. पण त्याचवेळी ते थोडे घाबरलेलेही असतात. बाळाला हातात घेण्यासाठी ते पुढे होतात. मात्र त्यांचे हात थरथरू लागतात. नवजात बाळ खूप नाजूक असतं. याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे बाळाला नीट कसं धरायचं त्याला त्रास होणार नाही ना याची काळजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. ते अतिशय सावधपणे बाळाला हातात घेण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी नर्स त्यांना आधार देते आणि बाळाला योग्य पद्धतीने पकडण्यास मदत करते. काही क्षणांच्या प्रयत्नानंतर अखेर ते आपल्या चिमुकल्याला कुशीत घेतात. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. आजूबाजूला उपस्थित असलेले लोकही हे दृश्य पाहून हसताना दिसतात.

मजबूत माणसाचेही हात इथेच थरथरतात

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर भरपूर व्हायरल झाला आहे. तो कोणाचा आहे त्यांचे नाव हॉस्पीटलाचे नाव ही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. हा व्हिडिओ शेअर करताना त्यासोबत आयुष्यात अनेक संकटांचा सामना करणारा माणूसही जेव्हा आयुष्य त्याला आनंदाचं कारणं देतं तेव्हा असाच भावूक होतो. अशा प्रकारचे कॅप्शन दिले आहे.

नेटकऱ्यांना आठवले स्वत:च्या आयुष्यातील क्षण

व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या अनुभवांनाही उजाळा दिला आहे. पहिल्यांदा बाळाला हातात घेताना आपलेही हात असेच थरथरले होते.असं काहींनी सांगितलं. तर काहींनी ही भीती नसून आपल्या बाळाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जाणवल्यामुळे आलेली घालमेल असल्याचं म्हटलं आहे.

या व्हिडिओमध्ये नर्सने वडिलांना ज्या पद्धतीने धीर दिला, त्याचंही कौतुक होत आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ मात्र वडिल होण्याचा पहिला अनुभव किती भावनिक असू शकतो, हे दाखवून जातो. बाळाला पहिल्यांदा कुशीत घेण्याचा तो क्षण शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवण्याचा जास्त सुंदर असतो.

Follow Us
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी...
Vilas Londhe : टिपू सुलतान जयंतीला उपस्थिती अन् वाद! भाजप नगरसेवक विलास लोंढेंनी स्पष्ट केली भूमिका