AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परदेशी जावई पडला पाया, ८९ वर्षांच्या पणजीची प्रतिक्रीया व्हायरल, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल व्वा…

सोशल मीडियावर सध्या एक भावूक व्हिडीओ व्हायरल होत आहे. भाषा जरी वेगळी असली आणि संस्कृती भिन्न असली तर आदर आणि सन्मानाची भाषा सर्व सीमांना ओलांडते असेच हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल....

परदेशी जावई पडला पाया, ८९ वर्षांच्या पणजीची प्रतिक्रीया व्हायरल, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल व्वा...
Foreign Son-in-Law Touches Feet
| Updated on: Mar 31, 2026 | 7:48 PM
Share

सोशल मीडियावर एक खूपच हृदयस्पर्शी व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.या व्हिडीओत एक ब्रिटीश व्यक्ती त्याच्या भारतीय पत्नीच्या ८९ वर्षांच्या पणजीला वाकून पाया पडताना दिसत आहे. त्यांच्या कुटुंबातील हा छोटासा प्रसंग पाहून लोकांच्या विविध प्रतिक्रीया आल्या आहेत. हा व्हिडीओ इंस्टाग्राम पेज @the.brit.bong.diary वर शेअर केला आहे. या अकाऊंटला Conor आणि Mrittika हे कपल चालवत असते.

भाषेशिवाय आपलेपणाची भावना

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की जेव्हा Conor हा त्याच्या पत्नीच्या ८९ वर्षांच्या पणजीच्या पायांना स्पर्श करुन तिचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. दोघांची भाषा आणि संस्कृती भिन्न असूनही त्याने भारतीय परंपरेनुसार अगदी आदराने पणजीच्या पायांना स्पर्श करुन तिचे आशीर्वाद घेतल्याचे पाहून अनेकांना बरे वाटले.पणजी देखील आपल्या जावयाला प्रेमाने आशीर्वाद देताना दिसत आहे.पणजी त्यास काही पैसे देताना देखील दिसत आहे. हा क्षण इतका खरा आणि भावूक आहे लोकांना देखील हे दृश्य पाहून बरे वाटत आहे.

भाषेची गरजच पडली नाही …

व्हिडीओ पोस्ट करताना त्यावर लिहिलेल्या ओळी या क्षणाला साजेशा आहेत. त्या पोस्ट मध्ये लिहीलंय की माझे ब्रिटीश पती आणि माझी ८९ वर्षांची पणजी यांच्या कोणतीही कॉमन भाषा नाही. केवळ प्रेम आणि आदर आहे. कपलने कॅप्शनमध्ये सांगितले की या एका क्षणाला भाषेचे कोणतेही बंधन राहात नाही. एक साधारण से जेस्चरच पुरेसे होते. ज्यामुळे Conor आता विदेशी राहिला नाही, एक कुटुंबाचाच भाग झाला आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

सोशल मीडियावर मिळाले प्रेम

या व्हिडीओला पाहून लोक भावूक झाले आहेत. आणि प्रतिक्रीया देत आहेत. एका युजरने लिहीलंय की आदर आणि सन्मान एक अशी भाषा आहे, ज्यास प्रत्येक जण समजतो. अन्य एका युजरने म्हटले की हा क्षण खूपच सुंदर आहे. प्रेमाच्या आड कोणतीही भाषा येत नाही. अनेक लोकांनी ब्रिटीश जावयाची कौतूक करताना म्हटले की त्याने भारतीय संस्कृतीला मनापासून स्वीकारले आहे.

Follow Us
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा