80% लोकांना माहिती नाही, जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म कोणता? जाणून घ्या
जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म कोणता? याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याची माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

तुम्हाला जगातील सर्वात मोठा धर्म कोणता? याची माहिती आहे का? नसेल माहिती तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याविषयी विस्ताराने माहिती देणार आहोत. तसेच जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म कोणता आहे? हे देखील जाणून घेऊया.
आपल्या जगात धर्माला खूप महत्त्व आहे. प्राचीन काळी अनेक धर्म होते, पण ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या उदयानंतर अनेक धर्म लोप पावले. काही मूलतत्त्ववादी देशांमध्ये अनेक धर्म लोप पावले आहेत आणि उरलेल्या मोजक्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, अंदाजांवर विश्वास ठेवला तर जगभरातील धर्मांची संख्या 300 हून अधिक असेल. परंतु हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, यहुदी आणि वुडू धर्मीय मोठ्या संख्येने आहेत. पण तुम्हाला माहित आहे का जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म कोणता आहे? समजावून घेऊया.
चौथा सर्वात मोठा धर्म कोणता?
जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यांचे प्रमाण 31.6 टक्के आहे. त्याखालोखाल मुस्लीम समाजाची संख्या 25.8 इतकी आहे. त्यानंतर हिंदू धर्म तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनुसार जगात हिंदूंची संख्या 15.1 टक्के आहे. चौथा, सर्वात मोठा धर्म कोणता, याबद्दल आपल्याला क्वचितच माहिती असते. चौथ्या क्रमांकावर ते येतात जे कोणत्याही धर्माला मानत नाहीत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशा लोकांची संख्या 14.4 टक्के आहे.
मोठ्या संख्येने लोक धर्म सोडत आहेत
यानंतर पाचव्या क्रमांकावर असलेल्या धर्माचे नाव बौद्ध धर्म आहे. या धर्माची लोकसंख्या 6.6 टक्के आहे आणि त्यानंतर ज्यू धर्म येतो, जो 0.2 टक्के आहे. वास्तविक, जगाच्या लोकसंख्येबाबत सन 2022 मध्ये धर्माच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. हे संशोधन सध्या चर्चेत आहे कारण काही दिवसांपूर्वी प्यू रिसर्च सेंटरने एका सर्वेक्षणात म्हटले होते की, जगात मोठ्या संख्येने लोक धर्म सोडत आहेत. या यादीमध्ये सर्वाधिक संख्या ख्रिश्चन धर्म सोडणाऱ्यांची आहे.
स्पेन आणि इटलीमध्ये ख्रिश्चनांची संख्या घटली
नेदरलँड्स, स्वीडन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, कॅनडा, अमेरिका या देशांतील लोकांनी मोठ्या संख्येने धर्म सोडला. स्पेनसारख्या देशात ख्रिश्चनांची संख्या 54 टक्क्यांवर आली आहे. बौद्ध धर्माला मानणारेही आपला देश जगभर सोडून जात आहेत. तर इटलीतील 20 टक्के लोकांनी ख्रिश्चन धर्म सोडला आहे.