AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपतींनी फक्त 17 सेकंदात रिती केली बियरची बॉटल, व्हायरल Video पाहून नेटकऱ्यांनी नोंदवल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी एका झटक्यात बियर रिचवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे.

राष्ट्रपतींनी फक्त 17 सेकंदात रिती केली बियरची बॉटल,  व्हायरल Video पाहून नेटकऱ्यांनी नोंदवल्या प्रतिक्रिया
राष्ट्रपतींनी एका झटक्यात बाटलीतली बियर रिचवली, Video पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
| Updated on: Jun 22, 2023 | 6:43 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. या ना त्या कारणामुळे व्हिडीओला प्रसिद्धी मिळत असते. मात्र यावेळी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रों यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत फ्रान्सचे राष्ट्रपती एका झटक्यात बियर रिचवताना दिसत आहेत. त्यांची ही कृती पाहून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. इमॅनुएल मॅक्रों टुलूज रग्बी खेळाडूंसोबत त्यांच्या आनंदात सहभागी झाले होते. रग्बी स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर खेळाडूंसोबत जल्लोष केला. तसेच आनंदाच्या भरात एका झटक्यात बियर रिचवली. या व्हायरल व्हिडीओमुळे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रों वादात अडकू शकतात. दारू पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहान देत असल्याचा आरोप आता त्यांच्यावर होत आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओत

विजयी जल्लोष करणाऱ्या खेळाडूंची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती मॅक्रों तिथे आल्यानंतर त्यांना कोरोना बियरची बाटली दिली गेली. हातात बियर दिल्यानंतर उत्साहाच्या भरात इमॅनुएल मॅक्रों यांची एका दमात बियरची बाटली रिती केली. ही बॉटल रिकामी करण्यासाठी त्यांना फक्त 17 सेंकदाचा अवधी लागला. त्यांच्या या कृतीनंतर उपस्थित खेळाडूंनी एकच जल्लोष केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओननंतर विरोधकांनी राष्ट्रपती मॅक्रोंवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपती हे मोठं पद असून त्या पदाची लाज राखणं गरजेचं अशी टीका विरोधकांनी केली आहे. ग्रीन्स पार्टीचे खासदार सँड्रिन रुसो यांनीही ट्वीट करून निशाणा साधला. “राजकीय नेतृत्व आणि विषारी मदार्नगी एकच फोटोत” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

सोशल मीडियावर या व्हिडीओखाली कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकांनी राष्ट्रपतींच्या कृतीचा निषेध केला आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, “राष्ट्रपती पदावर असलेल्या एका व्यक्तीने खुलेआमपणे दारू पिणे योग्य नाही. यामुळे चुकीचा संदेश जातो.” दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “अशा कृतीमुळे देशाचं नाव बदनाम होतं. त्यामुळे राष्ट्रपतींनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा.”

Follow Us
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?