Video: बिन वाजली, तो सरपटत थेट मांडवावर पोहचला, लग्नातील नागिण डान्सचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये नागिन डान्सचे गाणे वाजत आहे. मग एक व्यक्ती नाचण्यासाठी मांडवात उडी मारतो. यानंतर तो सापासारखा जमिनीवर रेंगाळू लागतो.

Video: बिन वाजली, तो सरपटत थेट मांडवावर पोहचला, लग्नातील नागिण डान्सचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल
लग्नातील नागिण डान्स
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 10:56 AM

आपल्या देशात डान्सचे अनेक प्रकार आहेत. त्यातीलच काही प्रकार सोशल मीडियावर रोज पाहायला मिळतात. जसा कधी भोजपुरी गाण्यावरचा डान्स व्हायरल होतो, तर कधी मित्राच्या लग्नात केलेला डान्स इंटरनेटवर व्हायरल होतो. या सगळ्यामध्ये असा एक नृत्य आहे, जो शतकानुशतके लग्नांमध्ये धुमाकूळ घालत आहे. या नृत्याचे नाव आहे नागिन डान्स. आपल्या देशातील जवळपास प्रत्येक लग्नात हे पाहायला मिळतं. हे नृत्य करण्याची प्रत्येकाची स्वतःची नवीन आणि वेगळी शैली आहे. याच नृत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू येईल. हा व्हिडीओ खूप जुना आहे, मात्र आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. (Funny Nagin Dance in indian wedding video goes Viral on social media funny dance video)

व्हिडिओमध्ये नागिन डान्सचे गाणे वाजत आहे. मग एक व्यक्ती नाचण्यासाठी मांडवात उडी मारतो. यानंतर तो सापासारखा जमिनीवर रेंगाळू लागतो. मग अचानक काहीतरी घडते, जे पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा व्यक्ती नक्कीच मागच्या जन्मी नाग असावा’ हा सीन या संपूर्ण क्लिपमध्ये पाहण्यासारखा आहे.

व्हिडीओ पाहा:

लोक हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मजेदार कॅप्शनसह शेअर करत आहेत, तसेच या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या मजेदार कमेंट्स आणि प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘बस कर भावा, तुला नागमणी देऊन टाकू’ हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरता येत नाही.

हेही पाहा:

Video: “याला म्हणतात निसर्गाचा न्याय”, 15 सेकंदात फैसला, कुत्र्याला त्रास देणाऱ्या माथेफिरुला जन्माची अद्दल

Video: कुत्रा मांजरीची लढाई नाही, तर कुत्रा मांजरीचं प्रेम, नेटकरी म्हणाले, वैर संपलं तरी कसं?