AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: कुत्रा मांजरीची लढाई नाही, तर कुत्रा मांजरीचं प्रेम, नेटकरी म्हणाले, वैर संपलं तरी कसं?

सध्या कुत्रा आणि मांजरीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा सोफ्यावर आनंदाने झोपलेला दिसत आहे. या दरम्यान मांजर अशी काही कृती करते, की आपल्याला प्राणीप्रेम काय असतं हे कळतं.

Video: कुत्रा मांजरीची लढाई नाही, तर कुत्रा मांजरीचं प्रेम, नेटकरी म्हणाले, वैर संपलं तरी कसं?
कुत्र्यावर प्रेम करणारी मांजर
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 5:45 PM
Share

कुत्रा मांजराचे अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापैकी काहींमध्ये दोघांमध्ये भांडणं होताना दिसतात. , तर काही एवढे मजेशीर असतात की, तुम्ही पोट धरुन हसता. सध्या कुत्रा आणि मांजरीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा सोफ्यावर आनंदाने झोपलेला दिसत आहे. या दरम्यान मांजर अशी काही कृती करते, की आपल्याला प्राणीप्रेम काय असतं हे कळतं. ( Cat Cute Video Goes Viral animal video when see licks sleeping dog will make you laugh cat dog viral video funny video)

तसं पाहायला गेलं तर कुत्रं आणि मांजरीचं जुनं वैर. पण सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये हे प्रकरण उलटे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये एक कुत्रा सोफ्यावर झोपलेला दिसत आहे. त्याचवेळी त्याच्या शेजारी एक मांजर बसलेली दिसते. ही मांजर त्याच्या जवळ येते आणि त्याला चाटते, थोडक्यात त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. या दरम्यान, कुत्राही उठतो. आता तुम्ही विचार करत असाल की, कुत्रा मांजर उठल्याबरोबर तिथून पळ काढेल. पण असं काही होत नाही.

चला तर मग प्रथम हा व्हिडिओ पाहूया.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेव्हा मांजर कुत्र्याला सतत चाटल्यानंतर झोपेतून उठवते, तेव्हा काही वेळाने कुत्राही तिला चाटायला लागतो. हे दृश्य सर्वांनाच थक्क करणारे आहे. कारण कुत्रा आणि मांजर यांच्यात अशी मैत्री क्वचितच पाहायला मिळते, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे.

21 सेकंदांचा हा मजेदार व्हिडिओ ChanceTomorrowDance नावाच्या ग्रुपने Reddit या सोशल डिस्कशन फोरमवर शेअर केला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. एका वापरकर्त्यावर टिप्पणी करताना लिहिले, जर्मन शेफर्ड मांजरीच्या पिल्लाशी किती सौम्यपणे वागतो. हा खरोखरच जबरदस्त व्हिडिओ आहे. त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ही मांजर किती क्यूट दिसत आहे.

हेही पाहा:

Video: दिवाळीआधी माकडांचा मेकअप, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आपले पूर्वज आपल्याही पुढे आहेत!

Video: हायना-सिंहाची लढाई, पाहा कोण विजयी, कोण पराभूत, नेटकऱ्यांना धक्का देणारा व्हिडीओ

 

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.