AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: “याला म्हणतात निसर्गाचा न्याय”, 15 सेकंदात फैसला, कुत्र्याला त्रास देणाऱ्या माथेफिरुला जन्माची अद्दल

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुत्र्याच्या कानाला धरुन त्याला उचलतो आहे, कुत्रं अक्षरष: विव्हळतं आहे, पण या माणसाला याची दया येत नाही. त्यावेळी असं काही घडतं की, हा निदर्यी माणसाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं.

Video: याला म्हणतात निसर्गाचा न्याय, 15 सेकंदात फैसला, कुत्र्याला त्रास देणाऱ्या माथेफिरुला जन्माची अद्दल
जेव्हा कुत्र्याच्या मदतीला गाय येते
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 6:11 PM
Share

फक्त माणसंच नाही तर प्राणीही बदला घेतात, आणि प्राणीही एकमेकांच्या मदतीला येतात. विश्वास बसत नसेल तर सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहा. तुम्हालाही कळेल की, प्राण्यांमध्येही एकमेकांबद्दल किती प्रेम आणि किती आस्था असते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुत्र्याच्या कानाला धरुन त्याला उचलतो आहे, कुत्रं अक्षरष: विव्हळतं आहे, पण या माणसाला याची दया येत नाही. त्यावेळी असं काही घडतं की, हा निदर्यी माणसाला त्याच्या कर्माचं फळ मिळतं. (Man was harassing dog suddenly cow has come take revenge animal attack video viral on social media Natures Judgement)

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने कानाला पकडून एका कुत्र्याला उचललं आहे. त्यामुळे कुत्र्याला खूप त्रास होत आहे. आणि ते विव्हळतं आहे. मात्र तरीही या निर्दयी माणसाला त्याची दया येत नाही, तो त्याला अजून वर उचलतो. कुणी माणसाला कानाला धरुन वर उचललं तर काय त्रास होईल याची कल्पना करा. तोच त्रास या मुक्या प्राण्याला होतो आहे. पण या माथेफिरुला त्याचं काही देणंघेणं दिसत नाही. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी कुणीही या कुत्र्याला सोडवत नाही. एकजण याचा व्हिडीओ बनवतो आहे. मात्र म्हणतात, निसर्ग कुणाचं काही बाकी ठेवत नाही, अवघ्या 15 सेकंदात असं काही घडतं की या माणसाला जन्माची अद्दल घडते.

हे कुत्रं विव्हळत असतानाच एक गाय जोरात धावत येते, आणि या माणसाला शिंगावर घेते. त्याला जमिनीवर लोळवते. त्यामुळे कुत्र या त्रासातून मोकळं होतं. पण ही गाय बरोबर या नराधमाला त्याच्या कृत्याची शिक्षा देते. जेव्हा गाय या माणसाला लोळवत असते, तेव्हा कुणा महिलेचा आवाज येतो, या माणसाला सोडवण्यासाठी. मात्र जेव्हा कुत्रं ओरडत होतं, तेव्हा तिथं असणाऱ्या कुणाच्यातही माणुसकी भूतदया नव्हती. पण जेव्हा माणसावर हल्ला झाला, तेव्हा लगेच लोक मदतीला धावले. पण, गाय काय या माणसाला सोडत नाही. त्याला पार जमिनीवर लोळवते.

पाहा व्हिडीओ:

व्हायल होणारा व्हिडीओ IFS सुशांत नंदा यांनी ट्विट केला आहे, बातमी लिहली जाईपर्यंत या व्हिडीओला तब्बल दीड लाखांहून अधिक व्हूव्ज मिळाले होते. लोकांनाही हा व्हिडीओ प्रचंड आवडत आहे. निसर्गाच्या शिक्षेची प्रचिती लोकांना या व्हिडीओतून येत आहे. लोक या व्यक्तीला योग्यच शिक्षा मिळाल्याचं सांगत आहेत.

व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘याला म्हणतात झटपट निकाल… अशा लोकांच्या बाबतीत असंच व्हायला हवे…! त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, ‘अशा लोकांच्या बाबतीत असेच व्हायला हवे, तरच हे लोक सुधरतील.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर कमेंट करताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा:

Video: कुत्रा मांजरीची लढाई नाही, तर कुत्रा मांजरीचं प्रेम, नेटकरी म्हणाले, वैर संपलं तरी कसं?

Video: दिवाळीआधी माकडांचा मेकअप, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आपले पूर्वज आपल्याही पुढे आहेत!

 

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.