Viral Video: कार चालवताना गाणं म्हटल्याचा तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून गूगलवर तरुणीच्या नावाचा शोध

मुलगी एका तुर्की गाण्यावर हावभाव देताना दिसत आहे. या दरम्यान, तिचे हावभाव पाहण्यासारखे आहे. ही मुलगी ज्या Krvn गाण्यावर मुलगी एक्स्प्रेशन आहे

Viral Video: कार चालवताना गाणं म्हटल्याचा तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून गूगलवर तरुणीच्या नावाचा शोध
व्हायरल झालेल्या मुलीचे नाव एलेना डाल्वरेन आहे, ती मूळची इस्तंबूल, तुर्कीची आहे


आजकाल कार चालवणाऱ्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात मुलगी एका तुर्की गाण्यावर हावभाव देताना दिसत आहे. या दरम्यान, तिचे हावभाव पाहण्यासारखे आहे. ही मुलगी ज्या Krvn गाण्यावर मुलगी एक्स्प्रेशन देत आहे, ती रॅपर उझीने गायलं आहे. हे गाणं या वर्षी 19 मार्च रोजी रिलीज करण्यात आले होतं, जे जगभर गाजलं. MOVIES_CLUB_007 नावाच्या खात्यावर हा व्हिडिओ YouTube वर शेअर केला गेला आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणी गाण्याबद्दल विचारत आहे, तर कुणी मुलीचे नाव आणि तिचे इन्स्टाग्राम अकाउंट जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ( girl driving car and listening uji krvn turkish song goes viral on internet )

विशेष गोष्ट म्हणजे कार चालवणाऱ्या या मुलीने लोकांना इतके वेड लावले आहे की, आता लोक तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर तिला शोधत आहेत. आम्ही शोधलं असता कळालं की, Google वर uzi krvn व्हायरल मुलीचे नाव लिहून तिच्याबद्दल सर्च केलं जात आहे. लोक अनेक कीवर्डद्वारे मुलीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

 

दरम्यान, इंटरनेटवर शोधल्यानंतर आम्हाला ही मुलगीही सापडली. व्हायरल झालेल्या मुलीचे नाव एलेना डाल्वरेन आहे, ती मूळची इस्तंबूल, तुर्कीची आहे. इंटरनेटवर शोधत असताना, आम्हाला पॉपनेबल नावाच्या वेबसाइटवर एलेनाचे प्रोफाइल सापडलं. त्यानुसार, एलेना एक प्रसिद्ध तुर्की गायिका आणि अभिनेत्री तसेच सोशल मीडिया इफ्लुएन्सर आहे.

27 वर्षीय एलेना इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. तिची फॅन फॉलोइंगही प्रचंड आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट aleyna_dalveren वर 17 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे एलेनाला पंजाबी गाणी ऐकायलाही आवडते. त्याने पंजाबी गायक हार्दिक संधूच्या ‘क्या बात है …’ या प्रसिद्ध गाण्यावरही रील बनवली आहे. ज्यात ती गाडी चालवताना गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. 12 सप्टेंबर रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ लोकांना आवडत आहे. हे 11 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.

हेही पाहा:

 

Video : बेसबॉल सामन्यादरम्यान मैदानावर अचानक आला कुत्रा, खेळ थांबला, पण नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडला!

Video: माकडासोबत सेल्फी घेणं पडलं महागात; मुलीने क्लिक करताच माकडाची करामत; हा व्हिडिओ पाहून लोटपोट व्हाल

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI