Video : बेसबॉल सामन्यादरम्यान मैदानावर अचानक आला कुत्रा, खेळ थांबला, पण नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडला!

एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो खूप मजेदार आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा आहे, जो बेसबॉल सामन्यादरम्यान मैदानात खेळत आहे.

Video : बेसबॉल सामन्यादरम्यान मैदानावर अचानक आला कुत्रा, खेळ थांबला, पण नेटकऱ्यांना हा व्हिडीओ खूप आवडला!
काहीवेळ पीचवर थांबल्यानंतर हा कुत्रा पुन्हा मैदानात धावायला लागतो

खेळांच्या सामन्या स्टेडियमध्ये बरेच मजेदार किस्से घडत असतात. आणि असे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. असे व्हिडीओ लगेच व्हायरल देखील होतात. बऱ्याचदा तुम्ही सर्वांनी खेळांच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये फिरणारे कुत्रे पाहिले असतील. क्रिकेट सामन्यातही बऱ्यचा अचानक हे कुत्रे मैदानावर पळत येतात. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो खूप मजेदार आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा आहे, जो बेसबॉल सामन्यादरम्यान मैदानात खेळत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार या कुत्र्याचे नाव रुकी आहे. ( During the baseball match, a dog came on the field and the game stopped. The video went viral Funny Video, Animal Video )

हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मायनर लीग बेसबॉलच्या अधिकृत ट्विटर हँडल पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत बेसबॉल सुरु असलेला दिसतो आहे. बॉल फेकला जात असतानाच हा कुत्रा मध्ये येतो, आणि त्यामुळे खेळ थांबवावा लागतो. थेट बेसबॉल पीचवर आल्यानंतर हा थोड्यावेळ तिथं थांबतो, आणि सगळीकडे पाहतो. यावेळी बेसबॉल खेळाडूही खेळ थांबवून कुत्र्याकडे पाहतात. मात्र, त्याला कुणीही हाकलत नाही. काहीवेळ पीचवर थांबल्यानंतर हा पुन्हा मैदानात धावायला लागतो, आणि शेवटी मैदानाबाहेर असलेल्या आपल्या मालकाकडे जातो.

पाहा व्हिडीओ:

व्हिडिओ शेअर केल्यापासून 6.1 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि ही संख्या अजूनही वाढत आहे. या शेअरवर अनेक कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. मायनर लीग बेसबॉलने त्याच्या स्वत: च्या पोस्टला प्रत्युत्तर देत, या बदमाशाचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, ‘हा कुत्रा खूप गोंडस आहे’ दुसऱ्याने लिहिले, ‘ हा कुत्रा कोणीतरी मला आणून द्या’ तिसऱ्याने लिहिले, ‘हा कुत्रा बेसबॉल सामन्यापेक्षाही जास्त मनोरंजक आहे’ याशिवाय, अनेकांनी इमोजीज शेअर करुन व्हिडीओला प्रतिसाद दिला.

हेही पाहा:

Video: माकडासोबत सेल्फी घेणं पडलं महागात; मुलीने क्लिक करताच माकडाची करामत; हा व्हिडिओ पाहून लोटपोट व्हाल

Viral Video: नव्वदीत स्टेअरिंग हाती, एक्सलेटर देऊन आजी भूर्रर्रर्र….आजीचा कार चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI