Viral Video: नव्वदीत स्टेअरिंग हाती, एक्सलेटर देऊन आजी भूर्रर्रर्र….आजीचा कार चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारी आजी, जी नव्वदीत कार चालवायला शिकली आहे आणि इतकी ट्रेन ड्रायव्हर झाली आहे की, आता हायवेवरही गाडी चालवत आहे.

Viral Video: नव्वदीत स्टेअरिंग हाती, एक्सलेटर देऊन आजी भूर्रर्रर्र....आजीचा कार चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल
नव्वदीत कार चालवणारी आजी

शिकण्याचं कुठलंही वय नसतं ‘ज्याने ही गोष्ट सांगितली आहे ती पूर्णपणे बरोबर आहे. याचं उत्तम उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. देवास जिल्ह्यातील 90 वर्षांच्या आजी रेशमबाई तंवर यांनी हे सत्य असल्याचे सिद्ध करुन दाखवलं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारी आजी, जी नव्वदीत कार चालवायला शिकली आहे आणि इतकी ट्रेन ड्रायव्हर झाली आहे की, आता हायवेवरही गाडी चालवत आहे. नव्वदीत कार चालवणाऱ्या आजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. ( Video of a 90-year-old woman driving a car goes viral.)

हा व्हिडिओ संदीप सिंग नावाच्या व्यक्तीने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ही आजीबाई महामार्गावर कार चालवत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास देखील स्पष्टपणे दिसत आहे. रेशम बाई तंवर यांचा कार चालवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आजीबाईंचा हा व्हिडीओ ट्विटर अकाउंटवरुन शे्अर केला आहे. शिवराज सिंह चौहान यांनी यासाठी दादीचे खूप कौतुक केले आहे आणि आपल्या ट्विटद्वारे दादीचे वर्णन इतरांसाठी प्रेरणा म्हणून केले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले, ‘आजीने आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे की, कुठलंही काम करण्यासाठी वयाची अट नाही. वय कितीही असो, आयुष्य जगण्याची उत्कट इच्छा असली पाहिजे! ’

पाहा आजीबाईचा कार चालवतानाचा व्हिडीओ:

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करताना लिहिले, ‘दादीला सलाम’ दुसऱ्याने लिहिले, ‘ग्रेट मी माझ्या आईलाही कार शिकवण्याचा प्रयत्न करेन’ अजून एकाने लिहिले, ‘आजीकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का?’ या व्यतिरिक्त, एकाने दादी टॅलेंटेड असं लिहिलं.

 

हेही पाहा:

Viral Video : मासे खाणारी बकरी पाहून नेटकरी आवाक, म्हणाले पहिल्यांदाच ‘मटणाला मासे खाताना पाहिलं!’

Viral Video : भूकंपाआधीच मांजरीला चाहूल, व्हिडीओ पाहून तुम्हीही आवाक व्हाल, पाहा प्राण्यांच्या सिक्स्थ सेंसचा पुरावा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI