Viral Video : भूकंपाआधीच मांजरीला चाहूल, व्हिडीओ पाहून तुम्हीही आवाक व्हाल, पाहा प्राण्यांच्या सिक्स्थ सेंसचा पुरावा

या व्हिडिओमध्ये, भूकंपाच्या थोड्या वेळापूर्वी एका मांजरीला त्याचा आवाज जाणवला आणि ती लगेच तिच्या जागेवरून पळून गेली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला, कारण काही दिवसांपूर्वी याच भूकंपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड विध्वंस झाला होता.

Viral Video : भूकंपाआधीच मांजरीला चाहूल, व्हिडीओ पाहून तुम्हीही आवाक व्हाल, पाहा प्राण्यांच्या सिक्स्थ सेंसचा पुरावा

प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, भूकंपाच्या थोड्या वेळापूर्वी एका मांजरीला त्याचा आवाज जाणवला आणि ती लगेच तिच्या जागेवरून पळून गेली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला, कारण काही दिवसांपूर्वी याच भूकंपामुळे ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड विध्वंस झाला होता. ( The cat already knew about the earthquake. See Viral video of the sixth sense of the cat )

ट्विटरवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये कॅरोल नावाची एक पांढरी मांजर एका खेळण्यातील माशासोबत खेळत आहे, पण तेवढ्यात तिला काहीतरी जाणवतं, तिला आधीच भूकंपाची चाहूल लागते. त्यामुळे ती मांजर अचानक सावध होते आणि खेळ थांबवून पळून जाते. मांजरीच्या वर्तनाबद्दल तिची मालकीन म्हणाली की, ती शांत बसल्यानंतर काही सेकंदांनीच भूकंपाचे धक्के जाणवले.

पाहा व्हिडीओ:

हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, महिलेने भिंतीवरील चित्राचा फोटो शेअर केला जो कॅरोल खेळत असलेल्या ठिकाणी क्रॅश झाला. मालक ब्रॉडी लँकास्टरने व्हिडिओला मथळा दिला, “चेष्टा करत नाही, भूकंपाला सुरुवात झाली जेव्हा मी कॅरोलला तिच्या नवीन फ्लॉपी फिश टॉयसोबत खेळताना रेकॉर्ड करत होतो. “मी रेकॉर्ड करण्यापूर्वी येथे काहीतरी घडत आहे हे तुम्ही पाहू शकता.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ जबरदस्त दिसत आहे. कॅरोलच्या संवेदना आणि तिला भूकंपाचा अनुभव कसा आला हे पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. एका नेटकऱ्याने लिहलं, “मी माझ्या पलंगावर होतो आणि माझी संपूर्ण खोली थरथर कापू लागली.” आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओवर कमेंट करून मांजरीचे खूप कौतुक केले जात आहे.

 

हेही पाहा:

Video | केक कापताना भलतंच घडलं, वाढदिवशीच अभिनेत्रीच्या केसांनी घेतला पेट, व्हिडीओ व्हायरल

Video | हिमतीने कॅन्सरला हरवलं, गोड मुलाचे शाळेत जंगी स्वागत, चेहऱ्यावरील हसू पाहून नेटकरी भावुक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI