Video | केक कापताना भलतंच घडलं, वाढदिवशीच अभिनेत्रीच्या केसांनी घेतला पेट, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ निकोल रिची (Nicole Richie) ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या वाढदिवशी केक कापताना दिसत आहे. केक कापताना ही अभिनेत्री अतिशय खूश दिसत आहे.

Video | केक कापताना भलतंच घडलं, वाढदिवशीच अभिनेत्रीच्या केसांनी घेतला पेट, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : आपला वाढदिवस हा कायमस्वरुपी स्मरणात राहावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. काही लोक आपल्या आवडीच्या लोकांना त्यांच्या वाढदिवशी खास असं सरप्राईज देतात. कोणी केक कापतो तर कोणी पार्टीचे आयोजन करतो. मात्र बर्थडेच्या दिवशी कधीकधी अशा काही घटना घडतात ज्यामुळे मोठे नुकसान होते. बर्थडेच्या दिवशी वेगवेगळ्या अपघाताच्या घटना तुम्ही पाहिल्या असतील. सध्या तर एक अतिशय वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री निकोल रिचच्या (Nicole Richie) वाढदिवशी तिचे केस चक्क जळून गेले आहेत. केस कापताना ही घटना घडली आहे. (actress nicole richie hair catches fire on her birthday funny video went viral on social media)

मेणबत्त्या विझविताना निकोलच्या केसांनी पेट घेतला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ निकोल रिची (Nicole Richie) ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या वाढदिवशी केक कापताना दिसत आहे. केक कापताना ही अभिनेत्री अतिशय खूश दिसत आहे. केक कापण्याअगोदर निकोल मेणबत्ती विझवित आहे. मात्र, यावेळी वेगळंच काहीतरी झालं आहे. मेणबत्या विझविताना निकोलच्या केसांनी पेट घेतला आहे. दोन्ही बाजूने निकोलच्या केसांना आग लागल्याचे दिसतेय.

खुद्द निकोलनेच व्हिडीओ पोस्टे केला 

केस पेटताच काय कारावं हे तिला समजत नाहीये. अतिशय आनंदी असलेली निकोल क्षणात घाबरली आहे. तसेच पेटलेले केस विझविण्यासाठी ती ओरडत आहे. हा व्हिडीओ खुद्द निकोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by NICOLE RICHIE (@nicolerichie)

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर अतिशय मजेदार अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी अशा प्रकारे केक कापणे चुकीचे असून सर्वांनी काळजी घ्यावी, असे सांगितले आहे.

इतर बातम्या :

Video | हिमतीने कॅन्सरला हरवलं, गोड मुलाचे शाळेत जंगी स्वागत, चेहऱ्यावरील हसू पाहून नेटकरी भावुक

Video | फूड डिलिव्हरी करणाऱ्या ड्रोनवर कावळ्याचा हल्ला, हवेतील युद्ध कॅमेऱ्यात कैद

Video | भरधाव वेगात रेल्वे रुळ पार करण्याचा प्रयत्न, फाटकाला आदळून मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

(actress nicole richie hair catches fire on her birthday funny video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI