AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा व्हिडीओ पहा, हिंमत तुमची कुठल्या पक्षाची अंडी चोरायची!

ही क्लिप 17 सेकंदांची असून, यामध्ये एक मोर अनेक अंड्यांजवळ बसलेला दिसत आहे.

हा व्हिडीओ पहा, हिंमत तुमची कुठल्या पक्षाची अंडी चोरायची!
peacock viral videoImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 24, 2022 | 4:30 PM
Share

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, ज्याच्या सौंदर्याचे जगभरात कौतुक केले जाते. मात्र, मोर केवळ सुंदरच नव्हे तर अतिशय शूरही असतात. त्याच्या शौर्याशी संबंधित एक जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ कधी आणि कुठे चित्रित करण्यात आला आहे, याची पुष्टी झालेली नाही. पण व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, जेव्हा एखादी महिला मोराची अंडी चोरण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो डब्ल्यूडब्ल्यूईच्या भांडणाप्रमाणे महिलेला मारून जमिनीवर फेकते.

ही क्लिप 17 सेकंदांची असून, यामध्ये एक मोर अनेक अंड्यांजवळ बसलेला दिसत आहे. इतक्यात एक स्त्री त्याच्या जवळ पोहोचते आणि त्याला उचलून पुढे फेकते. यानंतर ती जमिनीवर विखुरलेली सगळी अंडी गोळा करायला सुरुवात करते. काही सेकंदानंतर मोर उडत उडत येतो आणि त्या स्त्रीला अशा प्रकारे मारतो की ती दूर पडते.

मोराने महिलेला धडा शिकवल्याचा हा व्हिडिओ मंगळवारी @issawooo ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या क्लिपला 12 लाख व्ह्यूज, 90.6 हजार लाईक्स, 16.4 हजार रिट्वीट आणि 3 हजारांहून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.

एकीकडे हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्सना हसू आवरत नाही, तर दुसरीकडे युझर्सही मोराच्या या धाडसाला सलाम करत आहेत.

Follow Us
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प
थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या प.
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं...
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं....
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत
एकच जागा, वाढती नाराजी? ठोंबरे पाटील यांचे ते स्टेटस चर्चेत.
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची
साहेब, आपला आदेश..., ती ट्वीटर पोस्ट अन् चर्चेला उधाण, विधान परिषदेची.
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर....
सपकाळांच्या अंतरात्मा वक्तव्यावर शिंदेंचा चिमटा; आत्मा हरवला तर.....
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का
रुपाली चाकणकरांचा पटलवार! खरात प्रकरणी थेट कोर्टात धाव, नेमकी भानगड का.
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा..
बच्चू कडू शिवसेनेत दाखल, आता पुढे काय? शिंदे म्हणाले, विश्वासाला तडा...
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक
...म्हणून कॉंग्रेस पक्षाची विधानपरिषेदत उमेदवार देण्यातून माघार, नेमक.
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण...
शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचं नाव समोर, कारण....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार....
बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार.....