Video : चॅलेंज द्यायचं नाय! नातवाचं फिटनेस चॅलेंज आजीबाईकडून 2 सेकंदात पूर्ण, व्हीडिओ पाहून आश्चर्यचकित व्हाल…

Video : चॅलेंज द्यायचं नाय! नातवाचं फिटनेस चॅलेंज आजीबाईकडून 2 सेकंदात पूर्ण, व्हीडिओ पाहून आश्चर्यचकित व्हाल...

हा व्हीडिओ punjabi_industry__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 21, 2022 | 12:35 PM

मुंबई : सोशल मीडियावर सध्या रील्सचा महापूर आलाय. अनेकजण आपले छोटे-छोटे व्हीडिओचं रील बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात. यातले काही व्हीडिओ तुफान व्हायरल (viral video)  होत असतात. आता एका आजीबाईंचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात ही आजीबाई एखाद्या बॉडीबिल्डरप्रमाणे व्यायाम करताना (Grandmother Fitness Video) दिसतेय. केवळ सात सेकंदाच्या व्हीडिओने या आजीबाईला प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहोचवलं आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या एका 80 वर्षांच्या आजीबाईचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये 80 वर्षांची आजी घराच्या छतावर आलेली दिसतेय. या दरम्यान तिाचा नातू गच्चीवर व्यायाम करायला येतो. अन् तो आपल्या आजीला चॅलेंज देतो की हे वजन उचलून दाखव, मग आजीबाईही नातवाचं चॅलेंज स्विकारते. अन् तिचा आपला फिटनेस दाखवून देते. यानंतर आजी जे करते ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. ही आजी थेट वजन उचलते. हा व्हीडिओ इतका व्हायरल होतोय की याला काही तासातच तो हजारो लोकांनी पाहिला आहे.

नातू बॉडी फिट ठेवण्यासाठी छतावर वेट लिफ्टिंग करतोय. इतक्यात आजी काही कामासाठी गच्चीवर पोहोचते. 80 वर्षांच्या आजीला पाहून नातवाने गंमतीने तिला फिटनेस चॅलेंज देतो. नातवाला कल्पनाही नव्हती की आजी असं काही करू शकते. पण ही आजी हे चॅलेंज पूर्ण करते. आजीने नातवाचे आव्हान स्वीकारलं आणि पुढच्या दोनच सेकंदात वजन उचलून नातवाला चकित केलं. आपल्या 80 वर्षांच्या आजीला वेट लिफ्टिंग करताना पाहून नातवाला आश्चर्य वाटतं.

हे सुद्धा वाचा

हा व्हीडिओ punjabi_industry__ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. याला आतापर्यंत चार हजारांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत आजीबाईच्या फिटनेसचं कौतुक केलंय. फिटनेस असावा तर असा,असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें