टॉयलेटला जाऊन आलो म्हणत नवरदेवाची लग्नातून कल्टी!
फतेहपूर जसोडा गावचा रहिवासी असलेल्या या तरुणाचा विवाह गुरसहायगंज येथील एका मुलीशी झाला होता. 23 जून रोजी कन्नौज येथे मुख्यमंत्र्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. लग्नासाठी समारंभाची संपूर्ण प्रक्रिया अवलंबण्यात आली आणि लग्नाचा अर्जही सादर करण्यात आला.

लखनऊ: उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये टॉयलेट ब्रेकच्या बहाण्याने नवऱ्याने स्वत:च्या लग्नातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फतेहपूर जसोडा गावचा रहिवासी असलेल्या या तरुणाचा विवाह गुरसहायगंज येथील एका मुलीशी झाला होता. 23 जून रोजी कन्नौज येथे मुख्यमंत्र्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. लग्नासाठी समारंभाची संपूर्ण प्रक्रिया अवलंबण्यात आली आणि लग्नाचा अर्जही सादर करण्यात आला.
ठरलेल्या तारखेला वधू-वर दोघेही आपल्या कुटुंबीयांसह सामूहिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचले. सर्व काही व्यवस्थित चालले होते आणि लग्नाचे विधी संपूर्ण नियमांनुसार सुरू होता, तेव्हा नवरदेवाने टॉयलेटला जायचे असल्याचे सांगितले. ज्या मंगलकार्यालयात लग्न होते, तिथून बाहेर आल्यानंतर नवरदेव कार्यक्रमस्थळावरून पळून गेला. काही वेळाने नवरदेव परत न आल्याने लग्नात गोंधळ उडाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, संधी मिळताच नवरदेवाचे कुटुंबीयही कार्यक्रमस्थळावरून पळून गेले. त्यानंतर वधूपक्षाने ही नवरदेवाच्या कुटुंबीयांचा शोध घेतला, मात्र लग्न समारंभानंतरही त्यांचा शोध लागला नाही. त्याचवेळी वधू नवरदेवासाठी रडत राहिली. नंतर ती लग्न न करता निराश होऊन घरी परतली. वधूच्या घरच्यांनाही खूप आश्चर्य वाटलं, कारण त्यांना याची अजिबात कल्पना नव्हती.
