VIRAL VIDEO | नवरीचा ‘क्लोजअप’ फोटो काढायला गेला अन्…., नवरीच्या रिॲक्शनवर नेटिझन्स फिदा

इंटरनेटच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. लग्नसोहळ्यात नवरामुलगा रागवल्यानंतर नवरीबाईच्या खळखळून हसण्याचा असाच एक व्हिडीओही सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. (groom smacks photographer photoshoot bride)

VIRAL VIDEO | नवरीचा 'क्लोजअप' फोटो काढायला गेला अन्...., नवरीच्या रिॲक्शनवर नेटिझन्स फिदा
नवरा मुलगा अशा प्रकारे फोटोग्राफरला मारत आहे.

मुंबई : इंटरनेटच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. लग्नसोहळ्यात नवरामुलगा रागवल्यानंतर नवरीबाईच्या खळखळून हसण्याचा असाच एक व्हिडीओही सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. जाणून घेऊया नेमका काय़ आहे हा व्हिडीओ. (groom smacks photographer because of clicking a close up photoshoot of bride)

आपल्या बायकोकडे कोणी वक्रदृष्टी करून पाहण्याची हिम्मत केलेली कोणालाही खपत नाही. तिच्या रक्षणसाठी नवरा हा सदैव तत्पर असतो. त्यातही नव्या जोडप्याची बात तर काही न्यारीच असते. नवीन लग्न झाल्यानंतर नवरा मुलगा आपल्या बायकोला तळहाताच्या फोडासारखा जपत असतो. आपल्या बायकोवर संकट आले तर तो लिलया पोलतो. अशाच आशयाचा एक व्हिडीओ सध्या सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लग्न झाल्यानंतर वराला बाजूला सारत नवरीचा क्लोजअप फोटो काढण्याच्या नादात फोटोग्राफरला चांगलाच दणका बसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 45 सेकंदांचा हा व्हीडीओ 5 फेब्रुवारी रोजी सोशल मीडीयावर अपलोड झाला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकलेले नाही.

बरं फोटोग्राफरने नवरदेवाचा मार खाल्ल्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत नाहीये. तर फोटोग्राफरने मार खाल्ल्यानंतर नवरीच्या खळखळून हसण्याचे आख्खे नेटीझन्स दिवाणे झाले आहेत. नवरीच्या हसण्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. आपल्या नवऱ्याने फोटोग्राफरला मारल्याचे कळताच तिने मंचावरच पोट खळखळून हसायला सुरुवात केली. तिचे हे हसणे बाजूच्या एकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजू शकले नसले तरी नवरीच्या दिलखुलास हसण्यामुळे हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

नवरीच्या हसण्याने नवरदेव, फोटोग्राफराच राग गुल्ल

आपल्या नवऱ्याने फोटोग्राफरला मरलं हे समजल्यानंतर व्हिडीओमध्ये नवरी अगदीच मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे. हसणे न आवरल्यामुळे ती लग्नाच्या मंचावरच बसून पोट धरून हसत आहे. तिचे हेच हसणे बघून तिच्या नवऱ्याचाही राग पळून गेल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. सुरुवातीला रागात असलेला नवरदेव नवरीचे हसणे बघून नंतर तोही हसताेय. तर दुसरीकडे चोप बसलेल्या कॅमेरामॅनलासुद्धा आपले हसणे आवरलेले नाही. तोही नवरीसोबत हसताना दिसत आहे.

दरम्यान, 45 सेंकदांच्या या व्हिडीओने सध्या नेटविश्वात धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे समजले नसले तरी, 5 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर अपलोड झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना अजूनही हसू फुटत आहे.

इतर बातम्या :

Weight lose Tips | या गोष्टी आहारात घ्या…वजन कमी करण्यास होईल मदत!

‘…नाहीतर शेतकऱ्यांच्या घरीदेखील धाडी टाकतील’, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला मिश्किल टोला

Aadhaar Card | ‘आधार’शी नेमका कोणता मोबाईल क्रमांक जोडलाय? केवळ 5 मिनिटांत मिळेल उत्तर!

(groom smacks photographer because of clicking a close up photoshoot of bride)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI