Independence Day 2025 : बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो…स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या मित्र-मैत्रीण आणि प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा
भारताला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवशी देशभर उत्साह आणि ध्वजारोहण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून हा दिवस साजरा करू शकतो.

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. त्यामुळे सर्वच भारतीयासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस केवळ देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा होत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाला वंदन करण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. आज १५ ऑगस्टच्या निमित्ताने या दिवशी सर्वत्र ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच सोसायट्यांमध्ये तिरंगा फडकवून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी आपण एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करु शकतो.
स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हालाही तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि प्रियजनांना पाठवण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश आम्ही इथे देत आहोत. जे तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक पोस्ट किंवा इंस्टाग्रामवर वापरु शकते. तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींनाही पाठवू शकता. या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेशांनी तुम्हाला देशभक्त व्यक्त करता येईल. पण यामुळे ध्वजाचा अनादर होणार नाही याचीही काळजी घ्या.
स्वातंत्र्य दिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश
“प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे, सन्मान देशाचा वाढत जावो, सण स्वातंत्र्याचा चिरायू होवो! स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!”
“अखंड राहो विविधतेतील एकता; अविरत, उंच फडकावा विश्व तिरंगा! स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!”
“कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारं प्रेम म्हणजे देशप्रेम. स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.”
“आठवूया संघर्ष क्रांतीवीरांचा, भाग बनूया आत्मनिर्भर भारताचा, घरोघरी फडकवूया तिरंगा एकात्मतेचा, साजरा करूया महोत्सव स्वातंत्र्याचा. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना, ज्यांनी भारत देश घडविला. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“शक्ती, बलिदान आणि एकतेचे प्रतीक आहे तिरंगा, केवळ ध्वज नाही तर भारतीयांची ओळख आहे तिरंगा. ही ओळख जपणे हीच खरी देशभक्ती.”
“विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आहे आमुचा भारत देश महान. जय हिंद… जय भारत! भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला, ती आई आहे भाग्यशाली, जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“ज्यांच्या बलिदानामुळे लाभले स्वातंत्र्य, त्यांचे स्मरण करूया, भारत राष्ट्र विश्वास शोभूनी राहो यासाठी शपथ घेऊया. भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“नको जातीचा भेद, नको धर्माचा द्वेष, एकजुटीने बांधूया, नवा आणि समृद्ध देश. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”
