चला सांगा आपण यांना ओळखलंत का?

अशक्य चित्रे तयार करण्यासाठी अनेक कलाकारांनी या तंत्राचा वापर केला आहे. आता एका कलाकाराने मिडजर्नी नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅमचा वापर करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना गरिबीत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

चला सांगा आपण यांना ओळखलंत का?
Artificial intelligence photos
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 11, 2023 | 4:01 PM

मुंबई: व्हायरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेंड सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. इंटरनेटवर हे कलाकार आता अनेक एआय टूल्सचा वापर करून मनोरंजक गोष्टी दर्शविण्यात गुंतले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इतकी प्रगत झाली आहे की, फारसे कष्ट न घेता लोक यात आश्चर्यकारक चित्रे बनवू लागले आहेत. अशक्य चित्रे तयार करण्यासाठी अनेक कलाकारांनी या तंत्राचा वापर केला आहे. आता एका कलाकाराने मिडजर्नी नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅमचा वापर करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना गरिबीत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि याचे परिणाम सर्वोत्तम आहेत. हे फोटो प्रचंड व्हायरल होतायत.

कलाकार गोकुळ पिल्लई यांनी सात छायाचित्रे शेअर केली आहेत ज्यात या अब्जाधीशांना जर गरीब जीवन जगावे लागले तर ते कसे दिसतील हे दर्शविले आहे. या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, मुकेश अंबानी, मार्क झुकेरबर्ग, वॉरेन बफे, जेफ बेजोस आणि एलन मस्क यांचा समावेश आहे. या फोटोंमध्ये ही अब्जाधीशांनी लोकं फाटलेले आणि जुने कपडे परिधान केलेले दिसत आहेत. बॅकग्राऊंडमध्ये झोपडपट्टीचा परिसर दिसतो. हे फोटो शेअर झाल्यापासून या पोस्टला हजारो लाईक्स आणि अनेक कमेंट्स आल्या आहेत. ही पोस्ट पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, “पण एलन ही एकमेव व्यक्ती आहे जी गरीब असतानाही श्रीमंत दिसते.”

आणखी एकाने लिहिले की, “आश्चर्यकारकपणे ते आहेत तसेच दिसत आहेत. तिसऱ्याने लिहिले, ” एआय काय वेडी संकल्पना आहे.” दुसऱ्या एका फोटोत तो लुई व्हिटन गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसला. एआय फोटो इतके प्रगत झाले आहेत आणि पूर्णपणे खरे दिसतात, कोणते खरे, कोणते खोटे फोटो हे वेगळे करणे कठीण होते.