AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मदर्स डे’ निमित्त पायलट मुलाचे आईला भन्नाट गिफ्ट; विमानातील Video सर्वांच्या पसंतीस

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यात एक पायलट आपल्या आईला 'मदर्स डे' च्या निमित्त भन्नट सरप्राईज देतो. आपल्या आईचे आभार व्यक्त करतो.

‘मदर्स डे’ निमित्त पायलट मुलाचे आईला भन्नाट गिफ्ट; विमानातील Video सर्वांच्या पसंतीस
हा व्हिडीओ अनेकांना प्रेरित करत लोक भावूक होत आहेत. (Photo : Twitter/@anujdhar)
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 1:13 PM
Share

मदर्स डे (Mother’s Day 2022) 8 तारखेला झाला. तसं पाहिलंतर आईसाठी प्रत्येक दिवस खास असला पाहिजे. दरवर्षी प्रमाणे अनेकांनी आई सोबत फोट, व्डिडिओ पोस्ट करत आईसाठी यंदाचा मदर्स डे खास केला. या सर्वात सोशल मीडियावर एका आई-मुलाच्या विमानातील व्हिडिओचे सर्वत्र कैतुक होतयं. इंडिगो एअरलाइन्सने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक  व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो अनेकांना आवडला आहे. खूप लोक प्रेरित झाले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली. जे फार कमी लोक करू शकतात. या व्हिडीओमध्ये एक आई-मुलाची जोडी फ्लाइटमध्ये पायलटचा गणवेश घालून उभी आहे. आई आणि मुलगा दोघेही पायलट असून त्यांनी मिळून इंडिगो एअरलाईन्स उडवली. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिवरील नेटीझन्स प्रभावित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये त्या मुलाने पायलट होण्याची गोष्ट सांगितली आहे. त्याने सांगितले आपल्या आईला विमान उडवताना पाहून तो कसा प्रेरित झाला आणि तब्बल २४ वर्षांनंतर तो आईसोबत विमान उडवणार आहे. पायलट म्हणून आई आणि मुलाचे हे पहिलेच उड्डाण होते. मात्र, मुलाने कॉकपिटमध्ये बसून विमान चालवले, तर आईने पायलटच्या गणवेशात प्रवासी म्हणून प्रवास केला. (Indigo pilots son-mother duo fly plane together)

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक आई-मुलाची जोडी फ्लाइटमध्ये पायलटचा गणवेश घालून उभी आहे

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुलगा जेव्हा विमानात प्रवेश करतो तेव्हा तो आत बसलेल्या प्रवाशांना सांगतो की तो पहिल्यांदाच त्याच्या आईसोबत विमानात पायलट म्हणून उपस्थित होता. हे ऐकून विमानात बसलेल्या प्रवाशांना खूप आनंद झाला आणि सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. काही लोक भावूक होऊन रडायलाही लागले.

या खास प्रसंगी, मुलगा त्याच्या आईला मिठी मारताना आणि गुलाबांचा सुंदर पुष्पगुच्छ देताना दिसतो. इंडिगो एअरलाइन्सने हा व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मदर्स डेच्या दिवशी आई-मुलाच्या पायलट जोडीपेक्षा चांगले काय असू शकते?  मुलगा फ्लाइट चालवत होता आणि आई प्रवासी म्हणून प्रवास करत होती. याव्हिडिओवर लोक कंमेट्स करून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...