AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाहेरून पाहिलं तर झोपडी, आत शिरताच… असं कसं घडलं? लोक का बघताहेत हा Viral Video

एक व्हायरल व्हिडीओमध्ये बाहेरून जर्जर झोपडीसारखे दिसणारे घर आतून पाहिल्यावर धक्काच बसतो. बाहेरची अवस्था आणि आतील घर यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, आतून ते घर अत्यंत आलिशान असल्याचे दाखवले आहे. इटालियन मार्बल, शानदार सोफा आणि झूंबर यासारख्या सुविधांमुळे नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून लोकांच्या प्रतिक्रियांचा ओघ सुरू आहे.

बाहेरून पाहिलं तर झोपडी, आत शिरताच... असं कसं घडलं? लोक का बघताहेत हा Viral Video
बाहेरून झोपडी, आत शिरताच.
| Updated on: May 31, 2025 | 9:11 AM
Share

कव्हरवरून पुस्तकाची किंमत करू नये, असं लोक नेहमी म्हणतात. तुम्हीही ही म्हण ऐकली असेल. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओबाबतही असंच काहीसं म्हटलं जाऊ शकतं. कारण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जुने लोक जे म्हणत होते ते किती खरं होतं याची तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. चिखलाने माखलेल्या रस्त्याच्या किनारी असलेल्या या जर्जर झोपडीला पाहून कोणीही असंच म्हणेल. पण या घरात शिरल्यावर मात्र अनेकांची झोपच उडेल. काय आहे असं या घरात? लोक का बघत आहेत हा व्हायरल व्हिडीओ?

हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही नीट पाहा. ही एक झोपडी आहे. झोपडीवर जुनाट कौलं आहेत. लाकडाच्या पार्टिशनने ही झोपडी बांधली आहे. ही लाकडंही जुनाट आहेत. जवळून जाताना या घरात राहणारे लोक किती गरीब असतील याचा अंदाजा येतो. या व्हिडीओत एक व्यक्ती घराच्या आत शिरताना दिसतो. हा व्यक्ती घराच्या आत शिरताच आतील नजारा पाहून डोळे दिपून जातात. तुमच्या मनातील विचारांना एकदम धक्का बसतो. कारण बाहेरून अत्यंत साधी वाटणारी ही झोपडी आत शिरल्यावर एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलसारखी दिसते. या झोपडीत इटालियन मार्बलची लादी, शानदार सोफा आणि झगमग करणारे झूंबर पाहून तर मन मोहून जातं. घराचं इंटिरियर तर बघायलाच नको. या घरातील इतर खोल्याही एखाद्या महालासारख्याच आहेत. बाहेरून झोपडी वाटणाऱ्या या घरात शिरल्यावर डोळे दिपून जातात.

आम्हालाही झोपडी द्या

हे संपूर्ण घर फुली एअर कंडिशन्ड आहे. यात एक मॉड्युलर किचनही आहे. याशिवाय भिंतीवर एक सुंदर टाइल्सही लावलेली आहे. त्यामुळे घराची शोभा वाढलेली स्पष्ट दिसतेय. एकूण काय तर हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, असं असेल तर मग अशी झोपडी आम्हालाही हवीय.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @manojbachan1234 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने व्हिडिओवर टेक्स्ट लिहिले आहे, हे गरीबांचे घर पाहा तुम्ही. काही सेकंदांच्या या क्लिपला आतापर्यंत 29 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये नेटिझन्स आश्चर्यचकित होऊन आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

अल्लाह सर्वांना…

एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, अल्लाह सगळ्यांना असंच गरीबांचे घर देवो. दुसऱ्या युजरने आश्चर्य व्यक्त करत लिहिलं, हे तर अगदी शाही गरीब वाटतात. आणखी एका युजरने लिहिलं, जर गरीब असे असतील, तर भाऊ अमीर कोणत्या लेव्हलचे असतील? हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे आणि नेटिझन्स हे ऐषआरामी ‘गरीब’ घर पाहून थक्क झाले आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.