लव्ह जिहाद अजिबात नाही, हे आहे “लव्ह इन्सानियत”! हिंदू मुलीने मुस्लिम कुटूंबाची मनं अशी जिंकली
काही गोष्टी असतात ज्याला खुद्द निसर्ग सुद्धा नाकारू शकत नाही. अशा ठिकाणी माणसाची काय हिंमत ना?

“लव्ह जिहाद” हा शब्द आपल्याला नेहमी कानावर पडतो. एखाद्या हिंदू मुलीचं आणि मुस्लिम मुलाचं लग्न झालं की लगेचच या सगळ्याला “लव्ह जिहाद” चा टॅग देण्यात येतो. पण तुम्ही कधी “लव्ह इन्सानियत” पाहिलीये का? अशी गोष्ट तुम्ही कधी अनुभवलीये का? आम्ही जी गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत ती आहे “लव्ह इन्सानियत” ची गोष्ट. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? काही गोष्टी असतात ज्याला खुद्द निसर्ग सुद्धा नाकारू शकत नाही. अशा ठिकाणी माणसाची काय हिंमत ना? हिंदू आणि मुस्लिम कुटुंबाने एकमेकांचा जीव वाचवलाय. तो कसा वाचवला यातच आहे “लव्ह इन्सानियत”!
ही घटना आहे युपी मधल्या मेरठ मधली. इथे एक दुर्मिळ पद्धतीचं किडनी प्रत्यारोपण करण्यात आलंय. तुम्ही म्हणाल ह्यात काय विशेष रोज हजारो, लाखो लोकांचं केलं जातं.
शरीरातले अवयव ही अशी गोष्ट आहे ज्यांची गरज पडल्यावर रक्ताची माणसं इच्छा असूनसुद्धा तुम्हाला देऊ शकत नाहीत. या गोष्टी नैसर्गिकरित्याच जुळून याव्या लागतात.
आता प्रत्यारोपणासाठी कुणाचीही किडनी घेऊन कशी चालेल? मॅच व्हायला हवी ना. इतकी रक्ताची माणसं, आपल्याच धर्माची माणसं असताना सुद्धा एक हिंदू कुटूंब आणि एक मुस्लिम कुटुंब एकमेकांना वाचवू शकलं.
किडनी मॅच झाली. पण समाज, धर्म वेगवेगळे. आता ज्या गोष्टीला स्वतः निसर्ग नाकारू शकत तिथे माणसाची कायच हिंमत ना? आपण इथे धरतीवर कितीही नियम, धर्म, जात बनवू पण शेवटी ज्या गोष्टी निसर्ग जुळवून आणतो त्याला कुणीच विरोध करू शकत नाही याचा प्रत्यय ही गोष्ट वाचून येतो.
हिंदू आणि मुस्लिम कुटुंबाने एकमेकांना असा आनंद दिला जो आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. कारण हा आनंद स्वतः निसर्गाने दिला. ह्यात माणूस काहीच करू शकत नाही.
अदलाबदल पद्धतीने किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. किडनी तज्ज्ञ डॉ. संदीपकुमार गर्ग, डॉ. शालीन शर्मा आणि डॉ. शरत चंद्रा यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही रुग्णांना नवे आयुष्य मिळाले.
किडनी प्राप्तकर्ता मो. अफसर अली आणि किडनी दाता मो. अकबर अली अमरोहा येथील रहिवासी आहेत, तर दुसरे किडनी प्राप्तकर्ता अंकुर मेहरा आणि किडनी दाता अनिता मेहरा हे मोदीनगर, गाझियाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
दोन्ही कुटुंब वेगवेगळ्या समाजातील आहेत, पण या कुटुंबांनी एकमेकांच्या कुटुंबाला किडनी दान करून लव्ह इन्सानियत काय असतं हे दाखवून दिलं.
