खचून जाऊ नका, सुईत धागा ओवायची ही सगळ्यात सोपी ट्रिक! आजीला करा इम्प्रेस
जुगाडू व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्याच्या मदतीने अंधांनाही कोणत्याही त्रासाशिवाय आरामात सुईमध्ये धागा ओवता येऊ शकतो.

सोशल मीडियावर फक्त आपलं मनोरंजन करणारे आणि गमतीशीर व्हिडिओच येतात असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अगदी चुकीचे आहात. सोशल मीडियावर असेही व्हिडिओ आहेत जे आपलं काम अगदी सोपं करतात. ज्याला आपण लाइफ हॅक्स म्हणतो. असाच एक अफलातून जुगाडू व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्याच्या मदतीने अंधांनाही कोणत्याही त्रासाशिवाय आरामात सुईमध्ये धागा ओवता येऊ शकतो.
तुम्हाला आठवत असेल की लहानपणी आपली आई किंवा आजी कपडे शिवायला बसायची आणि आपल्यालाच सुईत धागा ओवून द्यायला सांगायची. तेव्हा हे जगातलं सगळ्यात अवघड काम वाटायचं. बराच वेळ यात जायचा, नाही का?
तुम्हाला जर हे अवघड काम अजूनही जमत नसेल तर हा व्हिडीओ खास तुमच्यासाठी आहे. या व्हिडीओच्या मदतीने एखादी अंध व्यक्ती सुद्धा हे काम सहज करू शकते. शेवटी हे काम करायची सुद्धा एक टट्रिक आहे.
तरीही जर तुम्ही याला अवघड काम समजत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, ज्याच्या मदतीने एक अंध व्यक्तीही सुईमध्ये एक धागा लावू शकतो.
व्हिडीओ
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आधी टूथब्रशच्या वर धागा ठेवते. तो धागा दुमडून ती व्यक्ती तो धागा सुईमध्ये ओवते. असं इतकं सोप्या पद्धतीने काहीच सेकंदात हे काम होतं.
tumanualidades.de नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ९० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. लोकं हा व्हिडीओ शेअर करतायत कमेंट करतायत.
