AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IAS Ria Dabi Marriage: UPSC टाॅपर टीना डाबी ची IAS बहीण या IPS अधिकाऱ्यासोबत लग्नबंधनात

रिया डाबी ही IAS अधिकारी असून सध्या ती राजस्थानमधील अलवर येथे तैनात आहे. त्यांचे पती मनीष कुमार हेदेखील 2021 बॅचचे अधिकारी आहेत. मनीषच्या कॅडरच्या बदलाबाबत गृह मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर दोघांच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाले आहे.

IAS Ria Dabi Marriage: UPSC टाॅपर टीना डाबी ची IAS बहीण या IPS अधिकाऱ्यासोबत लग्नबंधनात
Riya Dabi IAS Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 19, 2023 | 3:12 PM
Share

मुंबई: आयएएस अधिकारी टीना डाबी यांची धाकटी बहीण रिया डाबीचे लग्न झाले आहे. रिया डाबीने कोर्ट मॅरेज केल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तिचे IPS अधिकारी मनीष कुमार यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर रियाच्या आयपीएस पतीचे कॅडरही बदलण्यात आले आहे. त्यांची महाराष्ट्र मधून राजस्थान मध्ये बदली करण्यात आली आहे.

रिया डाबी ही आयएएस अधिकारी असून सध्या ती राजस्थानमधील अलवर येथे तैनात आहे. त्यांचे पती मनीष कुमार हेदेखील 2021 बॅचचे अधिकारी आहेत. मनीषच्या कॅडरच्या बदलाबाबत गृह मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर दोघांच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाले आहे. मनीष कुमार आणि रियाकडून लग्नाबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी लवकरच जयपूरमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

UPSC 2021 मध्ये 15 व्या स्थानावर

रियाची मोठी बहीण टीना डाबी 2015 पासून यूपीएससी टॉपर आहे. रिया देखील 2021 बॅचची आयएएस अधिकारी आहे. यूपीएससी 2021 मध्ये रिया डाबीने देशभरात 15 वा क्रमांक पटकावला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे दोघे आधी मित्र होते आणि नंतर प्रेमात पडले. दोघांची भेट मसूरी अकादमीत झाली. घरच्यांच्या संमतीनंतर दोघांनी २० एप्रिल रोजी कोर्टात लग्न केले.

दोन्ही बहिणी राजस्थानमध्ये तैनात

सध्या दोन्ही बहिणी राजस्थानमध्ये तैनात आहेत. मोठी बहीण टीना डाबी जैसलमेरमध्ये एसीएम म्हणून तर धाकटी बहीण रिया डाबी अलवरमध्ये एसीएम म्हणून तैनात आहे. नुकतेच टीना डाबी यांनी आयएएस प्रदीप गावंडे यांच्याशी दुसरे लग्न केले आहे. प्रदीप हा देखील राजस्थान कॅडरचा अधिकारी आहे. रिया सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर त्याचे खूप फॉलोअर्स आहेत.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा