IFS अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले, “चित्ता करतोय विंडो शॉपिंग!”, खूप हसाल!

आता हा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पोस्ट करतानाच त्याला कॅप्शन देण्यात आलंय, "चित्त्याने केली विंडो शॉपिंग!". हे असं कॅप्शन देण्यामागचं कारण काय? हे तर तुम्हाला व्हिडीओ बघूनच कळेल. हा व्हिडीओ IFS अधिकाऱ्याने ट्विटरवर पोस्ट केलाय.

IFS अधिकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले, चित्ता करतोय विंडो शॉपिंग!, खूप हसाल!
IFS Susanta nanda video
| Updated on: Jul 23, 2023 | 10:52 AM

मुंबई: तुम्ही कधी विंडो शॉपिंगला गेलाय का? ही अशा पद्धतीची शॉपिंग खरं तर सगळ्यांनाच जमत नाही. विंडो शॉपिंग हा अनोखा प्रकार आहे. यात तुमचा संयम तपासला जातो, खरं तर विंडो शॉपिंग संयमी लोकांनाच जमते असं म्हणायला हरकत नाही. आता हा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पोस्ट करतानाच त्याला कॅप्शन देण्यात आलंय, “चित्त्याने केली विंडो शॉपिंग!”. हे असं कॅप्शन देण्यामागचं कारण काय? हे तर तुम्हाला व्हिडीओ बघूनच कळेल. हा व्हिडीओ IFS अधिकाऱ्याने ट्विटरवर पोस्ट केलाय.

करतोय की नाही मग चित्ता विंडो शॉपिंग?

एक हरीण फिरत फिरत चित्त्यासमोर जातं. चित्ता जाळीच्या पलीकडून असतो, चित्त्याला त्या हरणाकडे बघण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. हरीण त्याच्या जवळ जातं पुन्हा मागे येतं, इकडे तिकडे उड्या मारतं. हरणाला बघून चित्ता सुद्धा जवळ जायचा, त्याच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करतो पण त्याला काय ते जमत नाही. कारण तो जाळीच्या पलीकडे असतो ना. हे सगळं बघून तुम्हाला सुद्धा विंडो शॉपिंग आठवेल. आपण आपल्या बजेट मध्ये बसणाऱ्या वस्तू तर नक्कीच विकत घेऊ शकतो पण जेव्हा गोष्टी बजेटच्या बाहेर असतात तेव्हा आपण सुद्धा पैशांची जुळवाजुळव करायचा खूप खूप प्रयत्न करतो पण ते काय आपल्याच्यानं शक्य होत नाही. आता असंच सेम टू सेम चित्त्याचं होतंय. चित्ता लांबून हरणाला बघतोय खरा त्याला हरीण हवंय पण चित्ता तिथवर पोहचू शकत नाही. करतोय की नाही मग चित्ता विंडो शॉपिंग?

सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. एका व्यक्तीने म्हटले की, हरणात जेवढा आत्मविश्वास दाखवला जातो, तितकाच आत्मविश्वास स्वत:वर असेल तर “डर के आगे जीत है”. एकाने चित्त्याला उडी मारता येत नाही का, अशी विचारणा केली. तर तिसऱ्याने विचारले की, कोणत्याही दुकानात जाऊन नुसतंच सामान बघून येणं याला म्हणतात.