AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड, बॅटरी आणि मोटर लावून तयार केली इलेक्ट्रिक स्प्लेंडर

VIRAL VIDEO | एका व्यक्तीने आपल्या स्प्लेंडर बाईकचं इंजिन काढून तिथं चार बॅटऱ्या लावल्या आहेत. त्याचबरोबर बॅटरीला मोटार जोडली आहे. हा जुगाड लोकांना अधिक आवडला आहे.

VIDEO | पेट्रोल वाचवण्यासाठी व्यक्तीने केला स्मार्ट जुगाड, बॅटरी आणि मोटर लावून तयार केली इलेक्ट्रिक स्प्लेंडर
Jugaad VideoImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 16, 2023 | 8:28 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (social media) केव्हा काय व्हायरल होईल हे कुणीचं सांगू शकत नाही. त्याचबरोबर त्या गोष्टीचा कोणी अंदाज सुध्दा लावू शकत नाही. कधी कोणी कारला हेलिकॉप्टर तयार करीत आहे. तर कोणी जुगाड करुन इलेक्ट्रीक स्कुटी तयार करीत आहे. सध्या एक नवीन जुगाड व्हिडीओ व्हायरल (Jugaad Video) झाला आहे. ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने एकदम भारी असा जुगाड केला आहे. हे सगळं पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती चार बॅटरीच्या मदतीने कशा पद्धतीने इलेक्ट्रीक बाईक (Splendor Bike) तयार करीत आहे. तुम्हाला हा जुगाड (VIRAL VIDEO) पाहूण काय वाटलं आम्हाला नक्की सांगा.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक स्प्लेंडर गाडी इलेक्ट्रीक वर्जनसोबत उभी असलेली दिसत आहे. त्या व्यक्तीने पेट्रोलवरती चालणाऱ्या गाडीला लाईट चालणाऱ्या चार बॅटऱ्या जोडल्या आहेत. ती बाईक उत्तमरीत्या सगळीकडे जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्यक्तीचा हा जुगाड लोकांना अधिक आवडला आहे. त्या व्यक्तीला यापुढे बाईक चालवताना अधिक पेट्रोल लागणार नाही.

हा व्हिडीओ इंन्स्टाग्रामवरती punjab_vibe_1313 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख 80 हजार पेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. लोक जुगाड करणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करीत आहे. त्याचबरोबर काही लोकांनी हा जुगाड पाहून डोक्याला हात लावला आहे. लोकांनी या जुगाडबाबत चांगली आणि वाईट अशी दोन्ही मतं मांडली आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, हा मुजस्मा कोणी बनवला आहे. दुसर्‍याने एकाने लिहिले की, पेट्रोल वाचवण्याची अप्रतिम युक्ती. तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ही जनरेटर बाईक बनली आहे. या जुगाडबद्दल तुमचे काय मत आहे? कमेंट करून सांगा.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.