
फक्त भारतात नाही तर जगभरात लग्नानंतर मुलीला तिचे घर सोडून सासरी जाण्याची परंपरा आहे. कारण लग्नानंतर मुलीचे संपूर्ण आयुष्य तिच्या पतीची, सासूची आणि सासऱ्यांची सेवा करण्याभोवती फिरते.

पण भारतात असा काही समुदाय आहे जिथे मुली नाही तर मुलांना मुलीच्या घरी पाठवले जाते. हा समुदाय पितृसत्ताक नाही तर मातृसत्ताक समाज पाळतो. ही परंपरा आजही सुरु आहे.

खासी समाज हा ईशान्येकडील मेघालय राज्यात राहतो. या समुदायात मुलींना संपत्ती ही वारसाने मिळते. याचा अर्थ मुलगी आयुष्यभर तिच्या आईसोबत राहू शकते.

यामध्ये अनेक लोक त्यांच्या नावापुढे वडिलांचे आडनाव वापरतात तर खासी जमातीमध्ये त्यांच्या नावापुढे आईचे आडनाव वापरतात. यामुळे तिथे मुले त्यांच्या वडिलांच्या नाही तर आईच्या नावाने ओळखली जातात.

त्यामुळे खासी जमातीमध्ये मुले मुलीच्या घरी जातात आणि मुलेच तेथील सर्व कामे करतात आणि मुली या बाहेर नोकरी करतात. ही परंपरा गेल्या अनेक काळापासून चालत आली आहे.

खासी जमातीमध्ये या महिलाच कुटुंबाच्या प्रमुख असतात. मालमत्तेसह सर्व जबाबदारी ही मुलीवर सोपवली जाते. अंतिम निर्णय हा तेथील महिलाच घेतात.