AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: मी 2055 मध्ये अडकलोय…; ‘टाइम ट्रॅव्हलर’च्या भयानक व्हिडीओने खळबळ, थेट भविष्यात जाऊन…

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती 2055मध्ये अडकला असल्याचे दिसत आहे. त्याने तेव्हाची दाखवलेली दुनिया ही फार वेगळी असल्याचे दिसत आहे.

Viral Video: मी 2055 मध्ये अडकलोय…; ‘टाइम ट्रॅव्हलर’च्या भयानक व्हिडीओने खळबळ, थेट भविष्यात जाऊन...
Viral videoImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 20, 2026 | 4:38 PM
Share

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. कधी कधी व्हायरल होणारे व्हिडीओ हे महत्त्वाची माहिती देतात. तर काही व्हिडीओ हे विचार करायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर एक रहस्यमयी व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दावा करत आहे की तो 2055 या वर्षात अडकून पडला आहे. या व्यक्तीचे म्हणणे आहे की तो अचानक 2055 मध्ये जागा झाला आणि परत येऊ शकत नाही.

सोशल मीडियावर सध्या पॅरिस (Paris)चे सुनसान रस्ते आणि रिकाम्या म्युझियम्सचे काही व्हिडीओ जंगलातील आगीप्रमाणे पसरत आहेत. कहाणी अशी आहे की, एक टिकटॉकरचा दावा आहे की तो 2055 मध्ये फ्रान्स (France) मध्ये अडकला आहे. या संपूर्ण जगात फक्त तो एकटाच माणूस उरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याच्या व्हिडीओमध्ये जगातील सर्वात व्यस्त असलेले लूव्र म्युझियम (Louvre Museum), मोठे हॉस्पिटल्स, आयफिल टॉवर आणि रेल्वे स्टेशन पूर्णपणे सुनसान दिसत आहेत.

@whitemask2055 या हँडलवरून या रहस्यमयी व्यक्तीने सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर जसे टिकटॉक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप सारे व्हिडीओ शेअर केले आहेत, जे पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. स्वतःला ‘टाइम ट्रॅव्हलर’ (Time Traveller) म्हणवणारा हा व्यक्ती प्रेक्षकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तिथले व्हिडीओ बनवतो. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या व्हिडीओमध्ये प्लेस्टेशन ७ (Playstation 7) सारखे फ्यूचर गॅजेट्सही दिसत आहेत.

लोकांचा विश्वास बसत नाही

भलेही हे व्हिडीओ पाहताना पूर्णपणे खरे वाटत असले तरी, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या इंटरनेटच्या जनतेला पटत नाहीत. उदाहरणार्थ, जर ३० वर्षांपासून माणसे नामशेष झाली असतील, तर म्युझियम आणि रस्ते इतके स्वच्छ कसे आहेत? कुठे धूळ नाही, कुठे कचरा नाही. तसेच, स्टाफशिवाय वीज पुरवठा कसा होत आहे? शिवाय हा व्यक्ती एका शहरातून दुसऱ्या शहरात कसा जात आहे? तो विमान उडवण्यात माहिर आहे का?

तर ही AI ची कमाल आहे का?

सध्या, एक्सपर्ट्स आणि नेटिझन्स यांचे मत आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI)ची कमाल आहे. काही यूजर्स म्हणतात की हे ‘ब्लेंडर’ सारख्या सॉफ्टवेअरवर बनवलेले 3D रेंडर आहे किंवा एखाद्या फ्यूचरिस्टिक व्हिडीओ गेमचे फुटेज आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, टिकटॉकवर या अकाउंटवरून पहिला व्हिडीओ ऑक्टोबर २०२२ मध्ये पोस्ट करण्यात आला होता. तेव्हा AI व्हिडीओ इतके अॅडव्हान्स नव्हते. यामुळेही काही नेटिझन्स हा रहस्यमयी व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत. सध्या, २०५५ चा हा कथित टाइम ट्रॅव्हलर इंटरनेटवर एक कोडं तयार करताना दिसत आहे. ही एडिटिंगची कमाल आहे की AI ची जादू, पण एक गोष्ट नक्की आहे की याने जगाला विचार करण्यास भाग पाडले आहे की आपले भविष्य कसे दिसू शकते.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.