आता थेट 200 टक्के टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं पाऊल, थेट… जगात खळबळ!
US Tariff : अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर मोठा कर लादला आहे. अशातच आता ट्रम्प यांनी फ्रेंच वाईन आणि शॅम्पेनवर 200 टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. अमेरिकेने भारतासह अनेक देशांवर मोठा कर लादला आहे. अशातच आता अमेरिकेने फ्रेंच वाईन आणि शॅम्पेनवर 200 टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे. याचे कारण म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गाझा संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या ट्रम्प यांच्या शांतता मंडळात सामील होण्यास तयार नाहीत, त्यामुळे ही धमकी देण्यात आली आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘ते लवकरच पद सोडणार आहेत. जर त्यांना शत्रुत्व दाखवायचे असेल, तर मी त्यांच्या वाईन आणि शॅम्पेनवर 200 टक्के कर लादतो आणि नंतर ते शांतता मंडळात सामील होतील.
200 टक्क्यांपर्यंत कर लादला जाणार
याआधी मार्च 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्स आणि इतर युरोपियन युनियन देशांमधून येणाऱ्या वाईन, शॅम्पेन आणि इतर मद्यांवर 200 टक्क्यांपर्यंत कर लादण्याची धमकी दिली होती. त्यावेळी ट्रम्प म्हणाले होते की, युरोपियन युनियन ही जगातील सर्वात अनियंत्रित कर आणि शुल्क लादणाऱ्या संघटनांपैकी एक आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी फ्रान्सला धमकी दिली आहे.
शांतता मंडळ काय आहे?
ट्रम्प यांनी हमास-इस्रायल शांतता चर्चेच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून शांतता मंडळाच्या स्थापनेची घोषणा केली. हे मंडळ गाझाच्या पुनर्बांधणीत आणि गुंतवणूक आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना या मंडळात सामील होण्यासाठी आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. मात्र यात सहभागी होण्यासाठी इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रस दाखवलेला नाही.
फ्रेंच वाइनची बाजारपेठ
फ्रान्सची अल्कोहोलिक ड्रिंक्सची बाजारपेठ अंदाजे $69 अब्ज किमतीची आहे. 2032 पर्यंत ती $73 अब्ज पर्यंत पोहोचू शकते. 2025 मध्ये विक्रीचे प्रमाण कमी झाले, परंतु महागाई आणि किमतीत वाढ झाल्याने मूल्य (महसूल) वाढले आहे. आता एक नवीन ट्रेंड समोर आला. यात लोक प्रमाणापेक्षा उच्च-गुणवत्तेच्या वाइनवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. अल्कोहोल नसलेल्या आणि कमी अल्कोहोल असलेल्या पेयांची मागणी देखील वेगाने वाढत आहे. त्यामुळे आता याच वाईनवर कर लादण्याबाबत ट्रम्प यांनी भाष्य केले आहे.
