Video: याला म्हणतात डोकॅलिटी! आता बनवा एकाच कढईत एकाच वेळी दोन भाज्या, पठ्ठ्याची टेक्नॉलॉजी नक्की वापरा
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पठ्ठ्याने वापरलेली टेक्नॉलॉजी पाहून तुम्हीही चकीत व्हाल

आपल्या देशात जुगाडू लोकांची काही कमी नाही. आपण जगाला चकित करण्यासाठी असे असे जुगाड करतो, जे पाहिल्यानंतर लोक थक्क होतात आणि विचारात पडतात. तरीही, काही जुगाडू लोक असे असतात जे आपल्या प्रतिभेने लोकांना आश्चर्यचकित करतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका मुलाने असा जुगाड केला की, तो पाहून लोक एकदम विचारात पडले आहेत. ते म्हणू लागले की असा जुगाड फक्त एक भारतीयच करू शकतो.
आपल्याकडच्या बॅचलर्स लोकांकडे वेळ खूप कमी असतो आणि कामाचा दबाव जास्त… अशा परिस्थितीत ओढावलेल्या परिस्थितीमुळे त्यांना मल्टीटास्किंग करावंच लागतं. आता हा समोर आलेला व्हिडिओच पाहा, ज्यामध्ये एका कढईला अशा प्रकारे विभागलं गेलं आहे की त्यात एकाच वेळी दोन डिशेस सहज बनवता येतात. हा जुगाडाचा कारनामा जेव्हा लोकांसमोर आला, तेव्हा प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला. कारण असं काही एकाच वेळी करणं प्रत्येकासाठी शक्य नाही.
वाचा: लवकरच मुंबईत शो घेणार, माझी औकात…; कॉमेडीयन कुणाल कामराचा थेट मुख्यमंत्र्यांना टोमणा
यह टेक्नोलॉजी इंडिया से बाहर नहीं जानी चाहिए 😹😂 pic.twitter.com/Vw96Ry4xt2
— Byomkesh (@byomkesbakshy) May 30, 2025
काय आहे व्हिडीओ?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका कढईला दोन भागांमध्ये अशा प्रकारे विभागलं गेलं आहे की त्यात दोन डिशेस सहज बनवता येतात. त्यानंतर गॅस पेटवून असंच केलं जातं. यात एक व्यक्ती एकाच वेळी दोन भाज्या बनवताना दिसत आहे. हे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे आणि म्हणत आहे की असे तंत्रज्ञान भारताबाहेर जाऊ देऊ नका.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @byomkesbakshy नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाइक केला आहे, तसेच कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं की, “असे लोक भाई जुगाडाच्या जोरावर काहीही करू शकतात.” दुसऱ्याने लिहिलं, “भाई, माणसाची मजबूरी आहे की त्याला एकाच वेळी अशा प्रकारे आपलं काम काढावं लागत आहे.” आणखी एकाने लिहिलं, “काहीही म्हण, भाई हा जुगाड तर जबरदस्त आहे.” याशिवाय आणखी अनेक युजर्सनी यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
