Nvidiaच्या सीईओचे भविष्य गुजराती महिला ठरवणार! थेट बाहेरचा रस्ता दाखवणार का? कोण आहेत आरती शाह?

एलिस हुआंग या चिनी गुप्तहेरासोबतच्या अफेयरमुळे जेनसेन हुआंग हे वादात सापडले आहेत. त्यांना कंपनीमधून बाहेरचा रस्ताही दाखवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. कंपनीकडून याबाबतची स्वतंत्र चौकशी सुरु झाली आहे, मात्र या चौकशी समितीत एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.

Nvidiaच्या सीईओचे भविष्य गुजराती महिला ठरवणार! थेट बाहेरचा रस्ता दाखवणार का? कोण आहेत आरती शाह?
| Updated on: Nov 12, 2026 | 6:23 PM

Who is Arti Shah:  अमेरिकी टेक्नॉलॉजी कंपनी एनवीडिया (Nvidia) चे सीईओ जेनसेन हुआंग यांच्या प्रेमप्रकरणाने सध्या जगभरातील टेक विश्वात खळबळ उडाली आहे. एआय विश्वातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनवीडियाच्या सीईओंनी प्रेम केलं मात्र ती महिला चीनची गुप्तहेर निघाली. एलिस हुआंग या चिनी गुप्तहेरासोबतच्या अफेयरमुळे जेनसेन हुआंग हे वादात सापडले आहेत. त्यांना कंपनीमधून बाहेरचा रस्ताही दाखवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. कंपनीकडून याबाबतची स्वतंत्र चौकशी सुरु झाली आहे, मात्र या चौकशी समितीत एका भारतीय महिलेचाही समावेश आहे. नेमकी कोण आहे ह महिला? जाणून घ्या…

कोण आहेत आरती शाह?

एनविडिया सध्या सीईओ, जेन्सन हुआंग यांच्या संदर्भातील एका मोठ्या वादात अडकली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्याविरुद्धच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. आता, या प्रकरणात एका भारतीय वंशाच्या महिलेच्या नावाचीही चर्चा होत आहे. तिचे नाव डॉ. आरती शाह आहे. त्या एनव्हिडियाच्या संचालक मंडळाच्या सदस्य असून कंपनीच्या दोन महत्त्वाच्या समित्यांवर कार्यरत आहेत. शाह, ज्यांनी यापूर्वी भारतातील गुजरात विद्यापीठात शिक्षण घेतले आहे, त्यांनी जवळपास 27 वर्षे प्रमुख अमेरिकन औषध कंपनी, एली लिलीमध्ये काम केले आहे.

Loading...

डॉ. आरती शाह या अमेरिकन औषध कंपनी ‘एली लिली’च्या माजी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य माहिती व डिजिटल अधिकारी होत्या. त्यांनी कंपनीत जवळपास 27 वर्षे काम केले. त्यांचा अनुभव केवळ औषधनिर्माण आणि औषध व्यवसायापुरता मर्यादित नाही. त्यांनी तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, डेटा सायन्स, डिजिटल हेल्थ आणि व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्येही महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत. एली लिली मधून त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली. त्यांनी 2021 मध्ये कंपनी सोडली. त्यांनी अनेक कंपन्या आणि गैर-लाभकारी संस्थांच्या संचालक मंडळावर काम करणे सुरू ठेवले.

एनव्हिडियाने 9 नोव्हेंबर2020 रोजी आरती शाह यांच्या संचालक मंडळात समावेशाची अधिकृत घोषणा केली. आरती शाह 2020 पासून एनव्हिडियाच्या संचालक मंडळावर आहेत. त्या कंपनीच्या ऑडिट कमिटी आणि कॉम्पेन्सेशन कमिटीच्या सदस्य देखील आहेत. त्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य माहिती व डिजिटल अधिकारी या पदापर्यंत पोहोचल्या. या भूमिकेत, त्या कंपनीच्या आयटी, डिजिटल हेल्थ, सायबर सुरक्षा, डेटा ॲनालिटिक्स आणि डिजिटल स्ट्रॅटेजीचे काम पाहतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us