AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan : मी खूप रोमँटिक माणूस, माझ्या दोन्ही बायकांना…आमिर खाननं प्रेमाबद्दल केलेलं वक्तव्य, काय म्हणालेला?

Aamir Khan On Love : आमिर खाननं एका जुन्या कार्यक्रमात प्रेमाबद्दल भाष्य केलं होतं. तो खूप रोमँटिक माणूस आहे, असंही म्हणालेला.

Aamir Khan : मी खूप रोमँटिक माणूस, माझ्या दोन्ही बायकांना...आमिर खाननं प्रेमाबद्दल केलेलं वक्तव्य, काय म्हणालेला?
| Updated on: Nov 12, 2026 | 6:20 PM
Share

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतचा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेत्यानं दोन लग्न केली असून त्याची दोनही लग्न टिकली नाहीत. आमिर खान अनेकदा मुलाखतींमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करतो. अशातच एका कार्यक्रमात अभिनेत्यानं प्रेमाबद्दल भाष्य केलेलं. आमिर खान म्हणालेला की, तो खूप रोमँटिक आहे.

काय म्हणालेला आमिर खान?

आमिर खान म्हणालेला की, ‘खरं तर, मी खूप रोमँटिक माणूस आहे. हे सांगायला खूप मजेदार वाटतंय, पण तुम्ही हे माझ्या दोन्ही पत्नींना विचारू शकता. मी खरं सांगतोय. मी अशा प्रकारचा रोमँटिक माणूस आहे की, माझे आवडते चित्रपट रोमँटिक आहेत आणि जेव्हा मी रोमँटिक चित्रपट पाहतो, तेव्हा मी त्यात पूर्णपणे हरवून जातो. मी खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे.’

‘माझ्या या प्रवासात, आपण आयुष्यात पुढे जात असताना, आपली प्रेमाबद्दलची व्याख्या, आपली समज हळूहळू बदलत राहते. जेव्हा आपण १८ वर्षांचे असतो तेव्हा त्यात एक वेगळाच उत्साह आणि भावना असते. मग तुम्ही लोकांना, आयुष्याला आणि स्वतःला समजून घेता. हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण करत असलेल्या बहुतेक चुका आपल्या स्वतःच्या असतात.’

‘आपल्याला वाटतं की, चूक दुसऱ्या व्यक्तीची आहे, पण आपण स्वतःच्या आत डोकावू शकत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांत स्वतःचं आत्मपरीक्षण करणं आणि माझ्यातील कमतरता काय आहे, हे समजून घेणं हा माझ्यासाठी एक प्रवास होता. मी कोणत्या चुका केल्या आहेत, मी त्यांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा तुम्हाला तुमचा जोडीदार सापडतो, ज्याच्यासोबत तुम्हाला खरोखर चांगलं वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं की, हीच खरी व्यक्ती आहे, हे माझ्यासाठी प्रेम आहे.’ असं आमिर शेवटी म्हणाला.

दरम्यान, आमिर खानचं रीना दत्तासोबत पहिलं लग्न झालेलं. मात्र, हे लग्न टिकलं नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेत्यानं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. पण, त्यांचाही घटस्फोट झाला. आता अभिनेत्यानं गौरी स्प्रॅटसोबत तिसरं लग्न केलं आहे.

Follow Us
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'
लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
Mumbai Local case : लोकलमध्ये तरुणीशी छेडछाड, नंतर रुळांवर ढकललं; मुलीला कायमचं अपंगत्त्व
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या...
मुंबई लोकल स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मध्य रेल्वेच्या निर्णयावरून नवा वाद!
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप,
पेंच अपघाताने राजकारण तापलं! परिणय फुकेंच्या मुलावर गंभीर आरोप, काँग्रेसचा चौकशीचा आग्रह
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारण
उद्धव ठाकरे यांनी बोलवली विभागप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकं कारणही आलं समोर
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; PM मोदींचं विकसित भारत संकल्प...
भारत जे ध्येय ठेवतो, ते पूर्णही करतो; याचा रोडमॅप... PM मोदींचं विकसित भारत संकल्पाबाबत मोठं विधान
सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
Sanjay Shirsat : सुनेत्रा पवार यांची भूमिका अस्पष्टच... संजय शिरसाट नेमकं काय काय म्हणाले?