AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा एक देश जिथे लग्नानंतर तीन दिवस नवरा-नवरीला टॉयलेटला जाण्यास बंदी; कुठे पाळली जाते ही परंपरा?

इंडोनेशियातील बोर्निओ प्रदेशातील टिडोंग जमातीमध्ये विवाहाची एक अजब पद्धत आहे. नवरदेव-नवरीला लग्नानंतर तीन दिवस शौचालय वापरण्यास मनाई आहे. ही परंपरा नकारात्मक शक्तींपासून संरक्षण आणि दाम्पत्याच्या सुखाची खात्री करण्यासाठी मानली जाते. तथापि, ही पद्धत आरोग्यासाठी हानिकारक असू शकते कारण त्यात अन्न-पाण्याचे सेवनही कमी केले जाते.

असा एक देश जिथे लग्नानंतर तीन दिवस नवरा-नवरीला टॉयलेटला जाण्यास बंदी; कुठे पाळली जाते ही परंपरा?
Indonesian bride and groomImage Credit source: Photo Source: Pexels
| Edited By: | Updated on: Feb 19, 2025 | 12:21 PM
Share

विवाह हा एक खास क्षण असतो. खासकरून जोडप्यांसाठीचा हा अविस्मरणीय क्षण असतो. त्यासाठी अनेक जोडपे हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी विविध फंडे वापरतात. विवाह दिमाखदार करण्यासाठी अनेक कल्पना राबवतात. अनेकांच्या विवाहाच्या परंपराही वेगळ्या असतात. त्या परंपरा लक्षात घेऊनच विवाह अविस्मरणीय करण्यासाठी विविध कल्पना वापरल्या जातात. पण इंडोनेशिया आणि मलेशियातील पद्धतच काही वेगळीच आहे. येथील बोर्निओ प्रदेशातील रहिवाशी टिडोंग या जमातीत विवाहाची विचित्र पद्दत आहे. या जमातीत नवरदेव आणि नवरीला तीन दिवस टॉयलेट वापरण्यासाठी दिलं जात नाही. त्यामागे काही परंपरा आहेत. त्यामुळेच वधू आणि वरांना शौचालय वापरायला दिलं जात नाही.

विवाह हा एक पवित्र समारोह आहे, अशी इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायातील लोकांची भावना आहे. त्यामुळे रिवाजानुसार नवरदेव नवरीला तीन दिवस शौचालयाला जाऊ दिलं जात नाही. शौचालयात घाण आणि नकारात्मक शक्ती असतात. त्याचा परिणाम वधू वरांवर होऊ शकतो, म्हणून त्यांना तीन दिवस शौचालयात जाऊ दिलं जात नाही.

नकारात्मक शक्तींचा प्रभाव

लग्नानंतर लगेचच वधू आणि वराने शौचालयाचा वापर केला तर त्यांच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडू शकतो, असं टीडॉन्ग समुदायातील लोकांची मान्यता आहे. लग्नानंतर लगेचच शौचालयाला गेल्यावर नवविवाहितांची पवित्रता भंग पावते, असा समजही या समुदायाचा आहे.

अपशकून होतो

याला अपशकून मानलं जातं. असं केल्याने वैवाहिक जीवनात नकारात्मक प्रभाव पडू शकतो. जर नवरदेव आणि नवरीने या ठिकाणाचा वापर केला तर त्यांच्या वाईट नजरेचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह, वाद आणि इतर समस्या येऊ शकतात, अशी या समुदायाची समज आहे.

अन्नपाणी कमी

त्यामुळे वाईट नजरेपासून दूर राहण्यासाठी आणि दाम्पत्य जीवन सुखी होण्यासाठी ही परंपरा पाळणं आवश्यक आहे. ही परंपरा निभावली जावी आणि वधू वरांनी या परंपरेचं पालन करावं म्हणून त्यांना अत्यंत कमी जेवण दिलं जातं. तसेच त्यांना पाणीही अत्यंत कमी दिलं जातं. त्यांना शौचालयाला जाण्याची वेळ येऊ नये म्हणून हे केलं जातं.

तब्येतीवर परिणाम

दरम्यान, अशा पद्धतीचे रिवाज आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. नवरदेव नवरीने टॉयलेटला जाऊ नये म्हणून त्यांना अन्न आणि पाणी कमी दिलं जातं. पण त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होतो. तीन दिवस हे व्रत पाळल्याने त्यांची तब्येत बिघडू शकते.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन