AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

२४ कॅरेट सोन्याचा बंगला, वॉश बेसिन ते स्विचपर्यंत सोनेच सोने, video viral

सोशल मीडियावर कधी काय व्हायलर होईल ते सांगता येत नाही. आता एक १० बेडरुमचा आलिशान बंगला व्हायरल होत असून या घरातील आतील सजावट पाहून तुमची बोटे तुमच्या तोंडात जातील या घरातील वॉश बेसिनपासून सर्व वस्तू २४ कॅरेट सोन्यापासून बनलेल्या आहेत.

२४ कॅरेट सोन्याचा बंगला, वॉश बेसिन ते स्विचपर्यंत सोनेच सोने, video viral
| Updated on: Jul 01, 2025 | 3:25 PM
Share

मध्य प्रदेशातील इंदूरच्या एका आलिशान बंगल्याचा एक व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून युजरच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. या बंगल्या संदर्भात एक दावा केला जात आहे की घरातील फर्निचरपासून ते वॉश बेसिनपर्यंत सोन्याचा वापर झाला आहे. एवढेच काय इलेक्ट्रीक स्विच देखील २४ कॅरेट सोन्याचे आहेत. हा व्हिडीओ अशा वेळी व्हायरल झाला आहे जेव्हा सोन्याचा दर गगनाला भिडलेला आहे. १ जुलैचा २४ कॅरेटचा सोन्याचा दर देशात १० ग्रामला ९७,५०० रुपयांवर पोहचलेला आहे.

कंटेन्ट क्रिएटर प्रियम सारस्वत यांनी या आलिशान घराचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यास दोन दिवसात २ कोटीहून अधिक व्हयूज होते. आता हा व्हिडीओ या अकाऊंटवरुन डिलिट केलेला आहे. परंतू एक्स साईटवर खूपच व्हायरल होत आहे. व्हिडीओत या घराचे मालक या घराच्या वस्तू २४ कॅरेट सोन्यापासून तयार केल्याचे दावा करताना दिसत आहेत.

येथे पोस्ट पाहा –

शानदार कारचे कलेक्शन

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ कंटेन्ट क्रिएटर बंगल्यात प्रवेश करण्यासाठी बंगल्याच्या मालकाकडे परवानगी मागताना दिसत आहेत. त्यानंतर घराच्या आवारात उभ्या असलेल्या शानदार कारचे कलेक्शन आपले लक्ष वेधून घेताना दिसते. यात १९३६ च्या विन्टेज मर्सिडिज कारचेही दर्शन होते.

10 बेडरूमचा आलिशान बंगला

या व्हिडीओत आपण पाहू शकता की १० बेडरुमच्या या आलिशान या बंगल्याचा नजारा पाहून क्रिएटर हैराण होत आहे. त्यानंतर हा क्रिएटर हैराण होऊन म्हणतो की मला खूप काही सोने दिसत आहे. यावर घराचा मालक म्हणतो की हे असली २४ कॅरेट सोन्याचे आहे.

वॉश बेसिनपासून स्विचपर्यंत सर्वकाही सोन्याचे!

या घराच्या अंतर्गत सजावटीच्या सामानात २४ कॅरेट सोन्याचा वापर झाला आहे. वॉश बेसिनपासून ते वीजेचे सॉकेट देखील सोन्याची आहेत. व्हिडीओ कंटेन्ट क्रिएटर आश्चर्यचकीत होऊन सोन्याचे स्विच दाखवताना दिसत आहे.

बंगल्यात गोशाला देखील

या बंगल्याच्या मालक केवळ त्यांच्या लक्झरीसाठी नाही तर त्यांच्या आध्यात्मिक आणि श्रद्धाळू स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे घरात सुंदर बगूचा आणि गोशाळा देखील आहे. इंदूरचा हा बंगला सोशल मीडियावर आर्कषणाचे केंद्र ठरला आहे. या बंगल्याची भव्यता पाहून युजर हैराण होत आहेत. या आलिशान बंगल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.