मारुती 800 च्या वर पान टपरी! खुल गया बंद अकल का ताला…
या फोटोमध्ये मारुतीची एक जुनी 800 कार उभी आहे त्यावर एक पानटपरी दिसते.

जुगाड तंत्र हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तंत्रांपैकी एक आहे. अनेकदा भारताच्या कानाकोपऱ्यातून असे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत जे लोकांना आश्चर्यचकित करतात. नुकताच असाच एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये मारुती 800 कार दिसत आहे. गाडीपर्यंत ठीक आहे पण या गाडीच्या टपावर एका महान व्यक्तीने पानटपरी टाकलीये. हा फोटो बघून तुम्ही खूप हसाल.
खरंतर हे चित्र इतकं गमतीदार आहे की, आयपीएस पंकज जैन यांनाही त्यावर प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवलं गेलं नाही. ट्विटरवर शेअर करत त्यांनी लिहिलं की, हे एक उत्तम इनोव्हेशन आहे.
या फोटोचं श्रेय त्यांनी सोशल मीडियाला दिलं आहे. या फोटोमध्ये मारुतीची एक जुनी 800 कार उभी आहे त्यावर एक पानटपरी दिसते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही युझर्सनी याचं वर्णन लखनऊचं चित्र असं केलं आहे, तर काही लोकांनी हे देखील सांगितलं आहे की, हा फोटो कुठला आहे.
This is quite innovative ? ( Pc – SM) pic.twitter.com/mfF96IE921
— Pankaj Nain IPS (@ipspankajnain) November 22, 2022
गाडीच्या छतावर हा माणूस पान टपरीत बसलाय. रस्त्याच्या एका बाजूला गाडी उभी आहे. काही लोक याला उत्तम कल्पना म्हणत आहेत, तर काही जण असं तर कुठेही दुकान उघडता येईल असं लिहित आहेत.
त्याचवेळी दुसऱ्या एका युझरने हा फोटो शेअर करत लिहिले की, मी या दुकानात जाऊन गोड पान खाल्ले आहे. आपला उदरनिर्वाह चालावा म्हणून भावाने चांगले डोकं लावून गाडीवर दुकान बनवले आहे.
भावाचा स्वभाव खूप चांगला असून आपली उपजीविका मिळवण्यासाठी अशी पावलं उचलणं ही चुकीची गोष्ट नाही, असंही त्यांनी लिहिलं आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
