Video: कैलास पर्वतावर निवास, त्याचीच सुरक्षा खास, ITBP जवानाकडून पहाडी आवाजात भोळ्या शंकराची आराधना

आयटीबीपीच्या एका अधिकाऱ्याने आपल्या मंजूळ स्वरांनी शंभू महादेवाला साद घातलीय. हे गीत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

Video: कैलास पर्वतावर निवास, त्याचीच सुरक्षा खास, ITBP जवानाकडून पहाडी आवाजात भोळ्या शंकराची आराधना
Arjun Kheriyal ITBP

मुंबई : आज देशभरात महाशिवरात्रीचा (Mahashivratri) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. कोरोनाचा संसर्ग असला तरी नियम पाळून अनेक जण आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करतायत. कुणी मंदिरात जाऊन तर कुणी घरातच पूजा करुन शंभू महादेवाची आराधना करतायत.अशातच आयटीबीपीच्या (ITBP) एका अधिकाऱ्याने आपल्या मंजूळ स्वरांनी शंभू महादेवाला साद घातलीय. हे गीत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. (ITBP Arjun Kheriyal Dedicate Song mere bhole ka hai bahay occasion of mahashivratri)

आयटीबीपीने (इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस) त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हा व्हिडीओ शेअर केल्याचं सांगत  अधिकारी अर्जुन खेरीयाल यांनी ‘मेरे भोले का है ब्याह चल इस ओर रे….’ हे गीत भक्तांना डेडीकेट केलंय. या गाण्याचे गीतकार वीरु लामा आहेत तर रोहित भंडारी यांनी या गीताला संगीत दिल्याची माहिती व्हिडीओच्या सुरुवातीला दिली आहे.

पाहा व्हिडीओ :

आयटीबीने शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांना देखील भावलाय. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच अर्जुन खेरीयाल यांच्या स्वरांचं कौतुक केलं आहे.

महाशिवरात्रीचं महत्त्व काय?

आजच्याच दिवशीच महादेव (Mahadev) आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते, असे पुराणात म्हटले जाते. म्हणून, महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त महादेवाची पूजा करतो आणि विधिनुसार व्रत करतो, त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात, अशी मान्यता आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. शास्त्रात हा दिवस खूप महत्वाचा असल्याचे सांगितले जाते.

(ITBP Arjun Kheriyal Dedicate Song mere bhole ka hai bahay occasion of mahashivratri)

हे ही वाचा :

Mahashivratri 2021 | त्र्यंबकेश्वर, औंढा-नागनाथ ते भीमाशंकर, महाशिवरात्रीलाही मंदिरं भाविकांसाठी बंद

Mahashivratri 2021 | अशाप्रकारे करा महादेवाची पूजा लवकरच होईल कृपा, मात्र  ‘या’ चुका करणे टाळा!

Published On - 12:46 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI