AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हिडिओने लोकांची मने जिंकली, ‘तेरे नाम’ चा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी!

हा व्हिडिओ 58 सेकंदाचा आहे. एक भंगार व्यापारी रिक्षा घेऊन रस्त्यावर फिरत आहे. त्याच्या हातात माईक आहे. लोकांना गोळा करण्यासाठी तो...

व्हिडिओने लोकांची मने जिंकली, 'तेरे नाम' चा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी!
Tere naam Viral videoImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 10, 2023 | 4:10 PM
Share

या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. होय, हा व्हिडिओ अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक सतीश कौशिक यांनी 8 फेब्रुवारी रोजी शेअर केला आणि लिहिलं- 20 वर्षांनंतरही लोकांमध्ये ‘तेरे नाम’ या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटाचा अभिमान वाटतो. खरं तर ही क्लिप एका ‘दर-बदर’ (@Mahanaatma1) युजरने पोस्ट करत लिहिलं होतं- इथे टॅलेंटची कमतरता नाही, फक्त इथे योग्य वेळी योग्य मार्ग मिळत नाही. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत 66 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अडीच हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शेकडो लोकांनी भंगारवाल्याच्या आवाजाचे कौतुक केले.

हा व्हिडिओ 58 सेकंदाचा आहे. एक भंगार व्यापारी रिक्षा घेऊन रस्त्यावर फिरत आहे. त्याच्या हातात माईक आहे. लोकांना गोळा करण्यासाठी तो सलमान खानच्या सुपरहिट चित्रपट ‘तेरे नाम’ मधील ‘ये प्यार में क्यूं होता है’ हे लोकप्रिय गाणे गाण्यास सुरुवात करतो.

त्याचा आवाज इतका तेजस्वी आहे की, त्यातल्या वेदनाही तुम्हाला जाणवतील! मात्र गाणं संपवताच तो लगेच कचऱ्याचा, प्लॅस्टिकचा जोरात आवाज करतो… स्क्रॅपर्स. ही क्लिप पाहिल्यानंतर हेमंत पाठक यांनी लिहिलं- गाणं जितकं चांगलं आहे, तेवढंच ते गृहस्थही चांगलं गात आहेत.

तर काही युजर्सनी ‘तेरे नाम’ आणि त्याचा दुसरा भाग पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी केली. 2003 साली प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते.

Follow Us
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर