भारतातील एकमेव स्टेशन जे दोन जिल्ह्यामध्ये आहे, अनेकांना माहिती नाही नाव

किती जरी हुशार असला तरी तो देखील सांगू शकत नाही, भारतातील असं एक रेल्वे स्टेशन जे दोन जिल्ह्यांमध्ये आहे. इंजिन एका जिल्ह्यात आणि शेवटचा डब्बा दुसऱ्या जिल्ह्यात असतो.

| Updated on: Mar 20, 2026 | 5:03 PM
1 / 5
भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोयीस्कर, फायदेशीर आणि सुरक्षित प्रवासामुळे अनेकजण ट्रेनलाच प्राधान्य देतात.

भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क मानले जाते. देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सोयीस्कर, फायदेशीर आणि सुरक्षित प्रवासामुळे अनेकजण ट्रेनलाच प्राधान्य देतात.

2 / 5

देशात हजारो रेल्वे स्थानके आहेत, मात्र काही स्थानके त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे विशेष चर्चेत असतात. असेच एक अनोखे रेल्वे स्टेशन जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे हे स्टेशन एकाच वेळी दोन जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे.

3 / 5

हे अनोखे स्टेशन उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्याचे नाव कंचौसी रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनचा एक भाग कानपूर देहात जिल्ह्यात येतो, तर दुसरा भाग औरैया जिल्ह्यात आहे. त्यामुळे प्रवाशांना एकाच स्टेशनवर उभे राहून दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असल्याचा अनुभव मिळतो.

4 / 5

या स्टेशनबाबत आणखी एक रंजक गोष्ट सांगितली जाते. असे म्हटले जाते की, येथे दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील गाड्या थांबतात तेव्हा त्या प्रत्यक्षात दोन जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी उभ्या असतात. म्हणजेच, गाडीचा एक भाग एका जिल्ह्यात तर दुसरा भाग दुसऱ्या जिल्ह्यात असतो.

5 / 5

या वैशिष्ट्यामुळे कंचौसी रेल्वे स्टेशन हे केवळ प्रवासाचे ठिकाण न राहता एक आकर्षण केंद्र बनले आहे. अशा अनोख्या गोष्टी भारताच्या रेल्वे व्यवस्थेचे वैविध्य आणि विशेषता अधोरेखित करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us