केरळची महिला अबुधाबीमध्ये मालामाल, जिंकली तब्बल 44.75 कोटी रुपयांची लॉटरी

एका भारतीय महिलेला (Indian woman) अबुधाबीमध्ये कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे. लॉटरी लागल्याने ही महिला मालामाल झाली आहे. या महिलेने बिग तिकिट लॉटरीचे (Big Ticket Lottery) बक्षिस जिंकले आहे.

केरळची महिला अबुधाबीमध्ये मालामाल, जिंकली तब्बल 44.75 कोटी रुपयांची लॉटरी
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 11:16 PM

अबुधाबी : एका भारतीय महिलेला (Indian woman) अबुधाबीमध्ये कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे. लॉटरी लागल्याने ही महिला मालामाल झाली आहे. या महिलेने बिग तिकिट लॉटरीचे (Big Ticket Lottery) बक्षिस जिंकले आहे. मीडिया रिपोर्टसनुसार लीना जलाल असे या महिलेचे नाव आहे. लीना जलाल या केरळमधील त्रिशूर येथील रहिवाशी आहेत. त्यांना बिग तिकिट लॉटरी अबुधाबी वीकली ड्रॉमध्ये तब्बल 22 दशलक्ष दिरहम (Dirham) म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 44.75 कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. या लॉटरीचा ड्रॉ 3 फ्रेब्रुवारीला काढण्यात आला होता. यामध्ये जलाल यांनी ही लॉटरी जिंकली. या महिलेचा तिकीट क्रमांक 144387 असा होता. याच नंबरला हे बक्षिस लागले आहे. लीना जलाल या अबुधाबीमध्ये एका कंपनीत काम करतात. त्यांना जेव्हा लॉटरी लागल्याचे कळाले तेव्हा प्रथम त्यांचाही यावर विश्वास बसला नाही.

चॅरिटी ट्रस्टला पैसे देणार

लीना जलाल यांना बिग तिकिट लॉटरी अबुधाबी वीकली ड्रॉमध्ये तब्बल 22 दशलक्ष दिरहम म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सुमारे 44.75 कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. जेव्हा त्यांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना हे खरे वाटले नाही, मात्र त्यांनी जेव्हा याची खात्री केली तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. एवढ्या सगळ्या पैशाचे त्या काय करणार असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर देताना सांगितले की, ते ही रक्कम दहा लोकांमध्ये शेअर्स करणार असून, त्या यातील एक वाटा चॅरिटी ट्रस्टला देखील देणार आहोत.

अन्य एका भारतीयाला देखील लागली लॉटरी

विशेष म्हणजे या लॉटरीचे बक्षीस जिंकणाऱ्या लीना जलाल या एकमेव भारतीय महिला नव्हत्या तर केरळमधील आणखी एका अनिवासी भारतीयाने दहा लाख दिरहम म्हणजे तुसमारे 2.03 कोटी रुपये जिंकले आहेत. संबंधित व्यक्ती ही मलप्पुरम जिल्ह्यातील रहिवाशी असून, आपण ही रक्कम 29 जणांसोबत शेअर करणार असल्याचे या व्यक्तीने सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही व्यक्ती अबुधाबीमध्ये अभियंता आहे.

संबंधित बातम्या

Viral Kid skating : 3 वर्षाच्या चिमुकल्याचं परफेक्ट स्केटिंग! ‘हा’ Video पाहतच राहाल

#LataMangeshkar : लता मंगेशकर व्हेंटिलेटरवर; लवकर बऱ्या व्हा, सोशल मीडियावर लोक करताहेत प्रार्थना

#Earthquake: जम्मू-काश्मीरपासून दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के तर सोशल मीडियात पडतोय मीम्सचा पाऊस

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.