मुंबई: सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. बॉलिवूडमधल्या या लोकप्रिय जोडीचं लग्न राजस्थानमधील जैसलमेर याठिकाणी होणार आहे. सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. सिद्धार्थ-कियाराचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र त्याआधी सोशल मीडियावर या लग्नावरून भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नावरून व्हायरल होणारे हे मीम्स पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल!