Viral : चिखलात खेळणाऱ्या मुलांना घ्यायला येते आई आणि.., पुढे काय होतं? पाहा Video

एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन मुले गढूळ पाण्यात खेळताना दिसत आहेत, परंतु त्यानंतर एक मजेदार घटना घडली, जी पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

Viral : चिखलात खेळणाऱ्या मुलांना घ्यायला येते आई आणि.., पुढे काय होतं? पाहा Video
डबक्यात खेळणारी मुले
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 2:25 PM

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मुलांना पाण्यासोबत किंवा पाण्यात खेळायला आवडतं आणि काही मुलं अशी असतात ज्यांना चिखलात खेळायला आवडतं. तुम्हीही तुमच्या लहानपणी असा काही ना काही खेळ खेळला असाल. त्यावेळी नेमकं काय चांगलं आणि काय चूक, कुठे खेळायचं आणि कुठे नाही हेच कळत नसत. त्यावेळी फक्त चिखलात उड्या मारत खेळणे आपल्याला माहीत असते. अशा गढूळ पाण्यात मुलांचे खेळतानाचे अनेक व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन मुले गढूळ पाण्यात खेळताना दिसत आहेत, परंतु त्यानंतर एक मजेदार घटना घडली, जी पाहून तुम्हाला नक्कीच हसू येईल.

आई येते, आणि…
खरं तर, आपल्या मुलांना अशा गढूळ पाण्यात खेळताना पाहून आई त्यांना शिव्या देण्यासाठी आणि तिथून घेऊन जाण्यासाठी तिथून धावत येते, पण मग असं काही घडतं, की ती अचानक खाली पडते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की आधी एक लहान मूल पाण्यात उभे राहून खेळत आहे आणि त्याला पाहताच एक लहान मुलगीही तिथे येते, जी बहुधा त्याची बहीण असावी. आता दोन्ही मुलांना असे पाहून आई तिथून त्यांना न्यायला धावत येते, पण तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती गढूळ पाण्यात पडली.

ट्विटरवर शेअर
हा खूप मजेदार व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर @buitengebieden_ या नावाने शेअर करण्यात आला आहे आणि त्याला कॅप्शनही लिहिले आहे, ‘आई मुलांना दाखवते की हे कसे केले जाते…’. अवघ्या 18 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 42 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 7 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे.

मजेशीर कमेंट्स
अनेकांनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरने लिहिले, की ‘ही चांगली आई आहे. माझी आई स्वच्छतेची चाहती होती. जर आम्ही मुलं डबक्यात उडी मारत असू, तर तिला राग येत असे. तर दुसर्‍या यूझरने कमेंट केली, ‘मुले हे नेहमी लक्षात ठेवतील’.

नोरा फतेहीच्या Naach Meri Rani गाण्यावर चिमुरडीचा अफलातून Dance, Viral Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

…आणि बाटलीतलं सर्व पाणी संपवतं माकड, प्राण्यावरील प्रेमाचा Video होतोय Viral

सिंहाप्रमाणे पक्षाने केली सशाची शिकार, कसा मारला फटका? पाहा हा Viral Video