Video | बिबट्या आधी दबा धरुन बसला, नंतर घेतली झेप, हरिणाच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

सध्या चर्चेत आलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे. या व्हिडिओमध्ये एका बिबट्याने हरणावर हल्ला केला आहे. प्रत्यक्ष हल्ला करण्याआधी बिबट्याने केलेली तयारी या व्हिडिओमध्ये पाहण्यासारखी आहे.

Video | बिबट्या आधी दबा धरुन बसला, नंतर घेतली झेप, हरिणाच्या शिकारीचा थरारक व्हिडीओ व्हायरल
leopard deer
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 7:50 AM

मुंबई : सिंह, वाघ आणि बिबट्या या प्राण्यांना जंगलातील सर्वात हिंस्त्र प्राणी मानले जाते. ते कधी कोणत्या प्राण्याची शिकार करतील हे सांगता येत नाही. त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या चर्चेत आलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे. या व्हिडिओमध्ये एका बिबट्याने हरणावर हल्ला केला आहे. प्रत्यक्ष हल्ला करण्याआधी बिबट्याने केलेली तयारी या व्हिडिओमध्ये पाहण्यासारखी आहे.

मरणाची चाहूल लागली, हरिण सतर्क झाले

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ अतिशय थरारक असा आहे. व्हिडिओमध्ये एका जंगलातील तलावात हरिण आरामात बसले आहे. थंडगार पाण्यात हरिण आराम करत असावे. मात्र त्याला आपल्या मरणाची चाहूल लागल्यामुळे ते सतर्क झाले आहे. त्याच्यामागे बिबट्या शिकार करण्यासाठी दबा धरून बसलाय.

दबा धरून बसलेल्या बिबट्याने केला हल्ला

व्हिडिओमध्ये सुरुवातीला बिबट्या नेमका कुठे आहे हे आपल्याला दिसत नाही. अतिशय चलाखीने बिबट्या गवतामध्ये दबा धरून बसलेला आहे. मात्र बिबट्याची हरणाला चाहूल लागल्याचा दिसतंय. आजूबाजूच्यांनी भरारी घेतल्यामुळे स्वतःची शिकार होण्याची चाहूल हरणला लागली आहे. त्यानंतर काही क्षणात बिबट्याने हरणावर झेप घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसतेय. तर दुसरीकडे जवळ येत असलेला बिबट्या पाहून हरिण जीवाच्या आकांताने पळत आहे. पाण्यात उंच उड्या घेत हरिण स्वतःचे रक्षण करण्यासाठी धडपडत आहे

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. बिबट्याचे शिकार करण्याचे कौशल्य आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हरणाची चाललेली धडपड अनेकांना आवडली आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर शेअर केलाय. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी साकेत बडोला यांनीदेखील ट्विट केला आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगली चर्चा आहे.

इतर बातम्या :

Video: मुलाचं मुंडन आणि आई ढसाढसा रडली, भावूक झालेला आईचा व्हिडीओ 4 कोटी लोकांनी पाहिला!

Video: घरात सगळे जमिनीवर झोपले होते, अचानक घोरपड घरात घुसली, आणि त्यानंतर…

Viral Video | वाळूत टोमॅटो भाजले, मग त्यावर चाट मसाला आणि चटणी घालून तयार केली टोमॅटो चाट, वारंवार का पाहिला जातोय हा व्हिडीओ?