Video : हाताची मूठ उघडताच मिळालं हटके सरप्राईज, चिमुकल्याच्या स्माईलने करोडो घायाळ

Video : हाताची मूठ उघडताच मिळालं हटके सरप्राईज, चिमुकल्याच्या स्माईलने करोडो घायाळ
चिमुकल्याचा हटके व्हिडिओ ्वहायरल

एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या मुलाने त्याला सरप्राईज मिळाल्यावर अशी अप्रतिम प्रतिक्रिया दिली ज्यावर सर्वच घायाळ झाले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 25, 2022 | 4:32 PM

मुंबई : मुले खूप गोंडस (Cute Child) आणि मोहक असतात. ती त्यांच्या क्युट स्माईलने (Cute Child videos) सर्वांची मनं जिंकतात. आपण कितीही रागवले असलो आणि घरी एखादे लहान मुल समोर आलं की अनेकांचा राग गायब होतो, किंबहुना त्यांच्याकडे लोभ, आसक्ती, क्रोध, अहंकार, अप्रामाणिकपणा, असत्य असे संस्कार नसतात, फक्त प्रेम असते. लहान मुलांसोबत (Viral Video) खेळणे, फेरफटाका मारणे आणि प्रवास करणे खूप आनंददायक असते. मुलांशी संबंधित सर्व प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात, जे पाहण्यात खूप मजा येते. असाच एक सुंदर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या मुलाने त्याला सरप्राईज मिळाल्यावर अशी अप्रतिम प्रतिक्रिया दिली ज्यावर सर्वच घायाळ झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका मुलाच्या चेहऱ्यावर गोंडस हास्य पसरवताना दिसत आहे. मुलाच्या या गोंडस स्माईलने सोशल मीडिया यूजर्स वेडे होत आहेत. त्याचाच परिणाम हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या दुनियेत धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे, म्हणूनच नेटकऱ्यांची या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पाडलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by kushi sarhma (@khusi_sarhma_12)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मूल ट्रेनमध्ये भीक मागताना दिसत आहे. यासोबतच व्हिडिओमध्ये ती व्यक्ती मुलासमोर मुठ बंद करून पुढे जाताना दिसत आहे. त्यानंतर ते मूल आपली मुठी त्या व्यक्तीच्या मुठीत मिसळते. त्यानंतर ती व्यक्ती आपली मुठ उघडते. यानंतर जे घडते ते सर्वांचे मन जिंकून घेते. त्या व्यक्तीने मुलासमोर आपली मुठ उघडताच त्याला त्यात एक चिठ्ठी सापडते.

चिठ्ठी पाहून तो चिमुकला आनंदाने हसत असल्याचे व्हिडिओमध्ये पुढे पाहिले जाऊ शकते. व्हिडिओमध्ये मुलाचा आनंद पाहून लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. मुलाचे गोंडस हास्य लोकांना इतके आवडले की त्यांनी हा व्हिडिओ जबरदस्त शेअर केला आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. khusi_sarhma_12 या पेजवर तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओवर हजारो कमेंट्सही पाहायला मिळत आहेत, हा व्हिडिओ सर्वांचेच मन जिकून जातो.

Mumbai cold : मुंबई गारठली, नेटकरी म्हणाले आता बर्फ पडणार वाटतं, वाचा सोशल मीडियावरील भन्नाट मीम्स

Video : या मजुराचा डान्स पाहून भल्या भल्या डान्सरला घाम फुटेल, सोशल मीडियाने बनवलं रातोरात स्टार

VIDEO : स्टेजवर पैसे उडवतानाचा उत्साह नडला आणि भाऊ थेट नवरदेवाच्या मांडीवर पडला, पाहा लग्नातील खतरनाक व्हिडीओ!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें