
2013 मध्ये सर्वाधिक काळ किस करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या थाई जोडप्याने आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एक्काचाई तिरनारत आणि त्यांची पत्नी लक्षानाने 58 तास, 35 मिनिटे आणि 58 सेकंद किस करत सर्वांचे लक्ष वेधले होते. आता हे कपल वेगळे होणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: एक्काचाईने याविषयी माहिती दिली होती. त्यांच्या घटस्फोटामागे नेमकं काय कारण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
एक्काचायने नुकताच बीबीसी पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. होस्ट मेगन जोन्सशी बोलताना तो म्हणाला की, ‘बराच चांगला वेळ आम्ही एकत्र घालवला याचा मला आनंद आहे. मला जुन्या चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत. आम्ही हे (विक्रम करण्याचे काम) एकत्र केले याचा मला अभिमान आहे.’ संभाषणादरम्यान एक्काचाय यांनी त्यांच्या विश्वविक्रमाच्या कठीण नियमांबद्दलही सांगितले. तो म्हणाला, ‘हे सोपे नव्हते. कारण, टॉयलेट ब्रेकच्या वेळीही आम्हाला एकमेकांना किस करत रहावे लागले होते.’
Longest kiss? Ekkachai & Laksana Tiranarat (Thailand) kissed for 58 hrs 35 mins and 58 secs, #ValentinesDay 2013 pic.twitter.com/YNWh14pBZh
— Guinness World Records (@GWR) February 14, 2016
किस करण्याचा हा विक्रम करण्यासाठी केवळ समर्पणाची गरज नाही तर शारीरिक लवचिकता देखील आवश्यक आहे. कारण, या जोडप्याने पूर्ण वेळ न झोपता 58 तास उभे राहून एकमेकांचे चुंबन घेतले. या यशानंतर हे जोडपे प्रेमाचे प्रतीक बनले होते. पण आता हे कपल विभक्त होत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या विभक्त होण्यामागे नेमके काय कारण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
एक्कचायने विभक्त होत असल्याची माहिती दिली. तो म्हणाला, ‘वेगळे झाल्याची घोषणा करताना मला खूप दुःख होत आहे. हा प्रवास आठवणींनी भरलेला आहे. पण आता वेगवेगळ्या दिशेला जाण्याची वेळ आली आहे.’ घटस्फोटानंतरही हे कपल एकमेकांचा आदर करत मैत्रीचे नाते कायम ठेवणार आहेत. तसेच मुलांचे सह-पालक बनणार आहेत.
एक्काचाय आणि लक्षानाचा रेकॉर्ड ब्रेकिंग क्षण ही ऐतिहासिक कामगिरी आहे. या कपलच्या रेकॉर्डनंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ‘लाँगेस्ट किस’ श्रेणीचे नाव बदलून ‘लाँगेस्ट किसिंग मॅरेथॉन’ असे ठेवले आहे.