
House on Sale : आजच्या महागाईच्या काळात घर घेणं फार कठीण आहे आणि आपलं स्वतःचं एक तरी घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. अशात जर कमी पैशांत आलिशान घर मिळत असेल तर प्रत्येक जण त्या घराचा मालक होण्याचा विचार करेल… एक आलिशान आणि पाच बेडरूम असलेलं घर फक्त आणि फक्त 42 लाख रुपयांमध्ये मिळत असेल तर तुम्ही देखील नक्कीच घर विकत घेण्याचा विचार कराल… सांगायचं झालं तर मुंबई, पुणे, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये घर घेणं आता किती कठीण आहे. पण आता तुम्ही स्वतःचं घर फक्त 42 लाख रुपयांपर्यंत खरेदी करु शकता. पण घराचं बाथरुम पाहिल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल…
ब्रिटीश शहरातील श्रूसबरी (Shrewsbury) येथील एक घर सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय आहे. पाच बेडरूमचं हे घर सामान्य दिसत असलं तरी, त्याच्या बाथरूमच्या फोटोंनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या घराची किंमत £399,000 म्हणजे भारतीय चलनानुसार 42 लाख रुपये आहे. पण घरात बाथरुम बाजू-बाजूला आहेत.
सांगायचं झालं तर, हे घर इवांस एस्टेट एजेंट्स (Miller Evans Estate Agents) द्वारा राइटमूव (Rightmove) वेबसाइट द्वारे लिस्ट करण्यात आलं आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते एक भव्य आणि प्रशस्त घर दिसते. पण सोशल मीडिया युजर्सने घर नीट पाहिलं तेव्हा घरातील बाथरुमने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. घरात दोन टॉयलेट काही इंचावर आहेत. त्यामध्ये एक भींत देखील नाही…
रिपोर्टनुसार, हा असामान्य शोध सर्वप्रथम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर “हाऊसिंग हॉरर्स” या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडिओला आधीच 3 हजार हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये क्रिकेटर म्हणतो, ‘हे आतापर्यंतचं सर्वात विचित्र बाथरुम आहे… तुम्हाला विश्वास बसणार नाही, पाच बेडरुमच्या या घराची किंमत 42 लाख रुपये आहे…’
व्हिडिओमध्ये असं दिसून आलं आहे की, दोन्ही सीट्स एकमेकांसमोर नसून एका सरळ रेषेत आहेत, ज्यामुळे असं दिसतं की ही “त्याचा आणि तिचा” (His & Her) शौचालये आहेत. नेटकरी विनोदी अंदाजात म्हणतो, ‘विचार करा तुम्हाला टॉयलेटला जायचं आहे आणि तुमचा जोडीदार तिकडे बसला आहे…’ सध्या घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.