Video : महाकाय अजगराचा व्यक्तीभोवती विळखा, व्हीडिओ पाहताना अंगावर काटा येईल…

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या हातात एक साप दिसतोय. तो काही क्षणात त्याला अक्षरश: विळखा घालतो. ही व्यक्ती या अजगराला खांद्यावर घेऊन जात आहे. पण तो त्याला विळखा घालतो. त्यामुळे त्याला जणू सापाने बांधलंय असा भास होतो.

Video : महाकाय अजगराचा व्यक्तीभोवती विळखा,  व्हीडिओ पाहताना अंगावर काटा येईल...
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 5:04 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर सापांचे असंख्य व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. या व्हीडिओना नेटकऱ्यांची पसलंतीही मिळताना दिसते. यातील अनेक व्हीडिओ पाहिल्यानंतर आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक धक्कादायक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. याध्ये 20 फूट लांबीचा अजगर (snake video) एका व्यक्तीच्या भोवती गुंडाळला जातो. हा व्हीडिओ पाहणं अनेकांसाठी मोठं कठीण काम आहे. अनेकांना हा व्हीडिओ पाहणं शक्य होत नाही. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

व्हीडिओ सापाच्या घरासारखा दिसत आहे. स्नेक हाउसमध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक साप असतात. एक व्यक्ती या सापांना एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवताना दिसत आहे. यादरम्यान त्याच्यासोबत जे काही घडते ते पाहून तुमच्या संवेदनाही उडातील. तुम्ही पाहू शकता की, या वेळी त्या व्यक्तीने 20 फूट लांबीचा महाकाय अजगर खांद्यावर घेतला आहे.

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या हातात एक साप दिसतोय. तो काही क्षणात त्याला अक्षरश: विळखा घालतो. ही व्यक्ती या अजगराला खांद्यावर घेऊन जात आहे. पण तो त्याला विळखा घालतो. त्यामुळे त्याला जणू सापाने बांधलंय असा भास होतो. खांद्यावर लटकलेला अजगर त्या व्यक्तीला त्याच्या शरीराभोवती गुंडाळू लागतो. हा धक्कादायक व्हीडिओ snakebytestv नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हीडिओला लोकांची खूप पसंती मिळत आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. तर 18 हजारांहून अधिकानी लाईक केलंय.

रस्त्यावर सापाचा मुक्त संचार

सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होतोय. यात अॅनाकोंडा साप रस्ता ओलांडताना दिसतोय. हा अॅनाकोंडा इतका मोठा आहे की त्याला पाहून लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या सापामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाल्याचं दिसतंय. पण या सापाला याचं ताही सोयरं सुतक नाही. तो आरामात रस्ता ओलांडतोय. अॅनाकोंडा पाहण्यासाठी आणि त्याचा व्हीडिओ बनवण्यासाठी आपल्या कारमधून उतरल्याचं पाहायला मिळत आहे.