Viral Video | डोळे बंद तरीही भाज्या कापण्यात तरबेज, बघता बघता बनवले नुडल्स, व्हिडीओ व्हायरल

Viral Video | डोळे बंद तरीही भाज्या कापण्यात तरबेज, बघता बघता बनवले नुडल्स, व्हिडीओ व्हायरल
man doing noodles

या व्हिडीओमध्ये एका माणसाने चक्क डोळ्यांवर (Eye) कापड लावून नुडल्स तयार केले आहेत. त्याच्या या कलाकारीचे सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच कौतूक होत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 22, 2022 | 7:26 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Vide0) होतात. यातील काही व्हिडीओ अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण हरखून जातो. काही व्हिडीओ मात्र अतिशय थरारक आणि चकित करणारे असतात. सध्या तर एक अतिशय अजब व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने चक्क डोळ्यांवर (Eye) कापड लावून नुडल्स तयार केले आहेत. त्याच्या या कलाकारीचे सोशल मीडियावर (Social Media) चांगलेच कौतूक होत आहे.

डोळे बंद करुन तयार केले नुडल्स 

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मध्यप्रदेशमधील इंदोर येथील आहे. या व्हिडीओमध्ये एक माणसू रस्त्यावर खाद्यपदार्थ विकत आहे. स्वत:ला तो इंदोरी जॅक स्पॅरो (Indori Jack Sparrow) म्हणतो. त्याने आपल्या डोळ्यांना कापड लावला आहे. कापड लावून त्याने नुडल्स तयार करण्यासाठी कोबी कापली आहे. डोळे बंद करुनही त्याने कोबी कापल्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत. नंतर सॉस, तिखट टाकून त्याने नुडल्स तयार केले आहेत. तसेच नुडल्स तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया त्याने डोळ्यांवर कापड लावून पूर्ण केली आहे. तसेच त्याने मोठ्या थाटात समोरच्या व्यक्तीला नुडल्स खायला दिले आहेत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Laksh|Nagpur Buzz⭐ (@nagpur_buzz)

इन्स्टाग्रावर लोकांच्या भन्नाट कमेंट्स 

हा व्हिडीओ अतिशय मजेदार असून त्याला इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 60 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तसेच हजारो लोकांनी लाईकदेखील केलं आहे. माणसाच्या या कलाकारीकडे पाहून काही लोकांनी तर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. ही कला तुम्ही कोठून शिकले आहात, असा प्रश्न एका नेटकऱ्याने केला आहे. तर चुकून किटक वगैरे फ्राय होतील, असे मिश्किल भाष्य दुसऱ्या एका नेटकऱ्याने केले आहे. nagpur_buzz या इन्स्टाग्राम चॅनेलवर हा व्हिडीओ पाहता येईल.

इतर बातम्या :

Viral : गवंडीकाम करणारी युवती बनली एका प्रॉडक्टची ब्रँड अॅम्बेसेडर, वाचा सविस्तर

Pandit Ji Rocks Dulha Shock : लग्नमंडपात वराला नव्हता धीर; मग पुजारी असं काही बोलले, की…

तब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video पाहून तुम्ही म्हणाल, Just mind blowing!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें