Video: समुद्रकिनारी तडपणाऱ्या डॉल्फीनसाठी देवदूत बनून आला, डॉल्फिनला वाचवणाऱ्यांचं नेटकऱ्यांकडून कौतुक

| Updated on: Oct 05, 2021 | 7:02 PM

सध्या असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतरही समजतं की, मानवता अजूनही या पृथ्वीवर जिवंत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे.

Video: समुद्रकिनारी तडपणाऱ्या डॉल्फीनसाठी देवदूत बनून आला, डॉल्फिनला वाचवणाऱ्यांचं नेटकऱ्यांकडून कौतुक
डॉल्फिनला वाचवणारा मसिहा
Follow us on

जगात मानवतेपेक्षा कुठलाही मोठा कोणताही धर्म नाही, असं नेहमी म्हटलं जातं. म्हणून आपल्याकडून मदतीची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक गरजूला मदत करणं गरजेचं आहे. हा नियम माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही लागू होतो. सध्या असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहिल्यानंतरही समजतं की, मानवता अजूनही या पृथ्वीवर जिवंत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे. ( Man save dolphin life heart touching video goes viral on social media )

बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की, बऱ्याच वेळा समुद्रातील मासे अचानक किनाऱ्यावर पोहचतात आणि नंतर पाण्यात जाता येत नाही. बऱ्याचदा, अशा माशांकडे किनाऱ्यावर लोक असतानाही दुर्लक्ष केलं जातं, अशाच ठिकाणी त्या माशाचे हाल पाहून एक मसिहा पुढं येतो. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. जो बघितल्यानंतर तुम्ही या माणसाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस समुद्रकिनारी फिरत आहे, जेव्हा त्याला पाण्याबाहेर तडपत असलेला डॉल्फिन दिसतो. तेव्हा हा माणूस त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला पुन्हा समुद्रात ढकलतो.

व्हिडीओ पाहा:

हा इमोशनल व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे. अनेक युजर्सने या व्हिडिओतील त्या व्यक्तीचे कौतुक करत कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, ‘मानवता फक्त अशा लोकांच्या हृदयात जिवंत आहे. हा सुंदर व्हिडिओ इस्टाग्रामवर ‘nature27_12’ नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहीपर्यंत याला 22 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video | शिकलेल्या सिंहाची सोशल मीडियावर चर्चा, निघाला सुलभ शौचालयातून बाहेर, व्हिडीओ व्हायरल

Video: आकाशातून पडणारा बर्फ पकडण्याचा प्रयत्न करणारं अस्वलाचं पिल्लू, नेटकरी म्हणाले, ‘ हे पाहून सगळा ताण विसरलो’