AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: आकाशातून पडणारा बर्फ पकडण्याचा प्रयत्न करणारं अस्वलाचं पिल्लू, नेटकरी म्हणाले, ‘ हे पाहून सगळा ताण विसरलो’

एक अस्वलाच्या पिलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे अस्वलाचं पिल्लू बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे.

Video: आकाशातून पडणारा बर्फ पकडण्याचा प्रयत्न करणारं अस्वलाचं पिल्लू, नेटकरी म्हणाले, ' हे पाहून सगळा ताण विसरलो'
अस्वलाचं हे पिल्लू 2 पायावर उभं राहतं, आणि आकाशातून पडणारे बर्फाचे कण पकडण्याचा प्रयत्न करतं.
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 11:32 AM
Share

इंटरनेटवर प्राण्यांचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे व्हिडीओ पाहून अनेकजण आपल्या रोजच्या जीवनातला ताण-तणाव सहज विसरुन जातात. प्राणी किती मनमोकळेपणे जगतात हीच गोष्ट माणसासाठी आश्चर्याची आहे. असाच एक अस्वलाच्या पिलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे अस्वलाचं पिल्लू बर्फाचा आनंद घेताना दिसत आहे. घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रात्री आस्वलाच्या माय-लेकाची जोडी फिरताना कैद झाली, त्यावेळी हा प्रसंग पाहायला मिळाला. Buitengebieden ने या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, “अस्वलाचं पिल्लू बर्फाचे कण पकडत आहे” असं या व्हिडीओवर कॅप्शन लिहण्यात आलं आहे. (Baby Bear enjoys during snowfall adorable video is going viral )

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये, अस्वल आणि त्याचं पिल्लू मानवी वस्तीत आल्याचं दिसतं आहे. पार्किंग एरियात हे दोघेही फिरत आहे. तेवढ्यात अस्वलाची आई त्यापासून थोडी दूर जाते, आई लांब गेल्याचं पाहून अस्वलाचं हे पिल्लू 2 पायावर उभं राहतं, आणि आकाशातून पडणारे बर्फाचे कण पकडण्याचा प्रयत्न करतं. पडणाऱ्या बर्फाचा हे पिल्लू मनमोकळेपणे आनंद घेताना दिसत आहे. अस्वलाचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही आपला सगळा ताण विसरुन नक्की आनंदीत व्हाल.

येथे व्हिडिओ पहा-

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया वेगाने नोंदवायला सुरुवात केली. व्हिडिओला प्रतिसाद देताना एका नेटकऱ्याने लिहिले, ‘ आतापर्यंत मी पाहिलेल्या सर्वात भारी व्हिडीओंपैकी हा एक व्हिडीओ आहे. मी या छोट्या अस्वलाच्या प्रेमात पडलो आहे ‘, तर दुसऱ्याने लिहिले की, खरोखरच असं दृश्य कुणालाही पाहायला मिळत नाही, हे पाहून लोक आनंदी झाल्याशिवाय राहणार नाहीत. याशिवाय अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला आहे.

हेही वाचा:

Video: मेंढीचा टबवर हल्ला, पण टबमध्ये डोकं अडकलं, आणि त्यानंतर जे झालं त्याने नेटकरी पोट धरुन हसले

Video: तब्बल 3 वर्षांनी सरप्राईज भेट, मित्राला रडू आवरेना, नेटकरी म्हणाले, ‘आम्हालाही आमच्या मित्रांची आठवण आली’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.