AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: मेंढीचा टबवर हल्ला, पण टबमध्ये डोकं अडकलं, आणि त्यानंतर जे झालं त्याने नेटकरी पोट धरुन हसले

प्राण्यांनाही भावना असतात, ते आनंदी आणि दुःखी देखील होतात, ते खेळतात आणि भांडतातसुद्धा. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मेंढी दिसते, जी खूप आनंदाने एकटीच खेळत आहे.

Video: मेंढीचा टबवर हल्ला, पण टबमध्ये डोकं अडकलं, आणि त्यानंतर जे झालं त्याने नेटकरी पोट धरुन हसले
मेंढीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडतो आहे.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Oct 05, 2021 | 10:33 AM
Share

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. असे बरेच व्हिडिओ आहेत जे खूप मनोरंजक आणि हसवणारे असतात. प्राण्यांचं जग हे मानवी जगापासून पूर्णपणे भिन्न आहे, पण, तरीही अनेक प्रकारे ते माणसांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. प्राण्यांनाही भावना असतात, ते आनंदी आणि दुःखी देखील होतात, ते खेळतात आणि भांडतातसुद्धा. आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मेंढी दिसते, जी खूप आनंदाने एकटीच खेळत आहे. ( animals-also-have-emotions-see-evidence-in-this-sheep-viral-video )

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कम्पाऊंडमध्ये एक मेंढी दिसते आहे, जी मनमोकळेपणे खेळते आहे, तिच्या समोर एक टब पडलेला आहे. समोर ठेवलेल्या टबकडे पाहून मेंढी थोडी आरामात मागे जाते, मग ती जोरात धावत येते आणि टबला धडक देते, पण त्याचवेळी तिचं तोंड या टबमध्ये जातं, आणि ही मेंढी उलटी होऊन जमिनीवर पडतो. पण, ती थकत नाही, पुन्हा उठते आणि टबवर हल्ल्यासाठी सज्ज होते, मात्र इथेच व्हिडीओ संपतो.

पाहा व्हिडीओ-

मेंढीचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडतो आहे. लोक व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. ही बातमी लिहीली जाईपर्यंत या व्हिडिओला 1700 व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच व्हिडिओवर शेकडो लाईक्स आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. परिमल नाथवानी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया देखील दिसत आहेत.

हेही पाहा:

Video: जगातील पहिली मांजर शेफ, भन्नाट रेसिपी पाहून चांगले चांगले गार, नेटकरी म्हणाले, ‘बाई, तूच काय ती सुगरण!’

फेसबुक, इन्स्टा अन् WhatsApp डाऊन, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

 

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश