Video | ढोलकीच्या तालावर “हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद”, मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ध्या चर्चेत अलेला एक व्हिडीओ हासुद्धा असाच मूड फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस अतिशय़ मजेदार पद्धतीने ढोलकी वजातोय.

Video | ढोलकीच्या तालावर "हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद", मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
SINGING VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच हजारो व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात तर काही व्हिडीओंना पाहून आपण खळखळून हसायला लागतो. सध्या चर्चेत अलेला एक व्हिडीओ असाच मूड फ्रेश करणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस अतिशय़ मजेदार पद्धतीने ढोलकी वजातोय. त्याची ढोलकी वाजवण्याची पद्धत पाहून अनेकांना हसू आवरलेले नाही. (man saying funny dialogue while playing dholak video went viral on social media)

ढोलकी वाजवण्याची अतिशय मजेदार पद्धत

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माणूस ढोलकी वाजतोय. त्याची ढोलकी वाजवण्याची पद्धत ही अतिशय मजेदार आहे. तो माणूस फक्त गाण्याच्या तालावरच ढोलकी वाजवतोय असे नाही तर मध्ये-मध्ये तो अतिशय़ मजेदार आणि कल्पक असे संवाद म्हणून दाखवतो आहे.

घुंबरु आणि ढोलकीच्या तालावर गातोय गाणं

या व्हिडीओमध्ये जो माणूस ढोलकी वाजतोय, त्याच्या हातामध्ये घुंगरु बांधलेले आहेत. घुंबरु आणि ढोलकीच्या तालावर तो एव्हरग्रीन आणि सर्वांच्या आवडीचं असं ‘तेरा गम अगर ना होता, तो शराब मैं ना पिता’ हे गाणे गात आहे. तसेच हे गाणे गात असताना तो मजेदार पद्धतीने ढोलकी वाजवतोय आहे.

गाणं म्हणत म्हणत भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो माणूस आहे तो थोड्याफार प्रमाणात अभिनयसुद्धा करताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. तसेच ढोलकी वाजवत असताना तो मजेदार असे डायलॉग म्हणतोय. हिंदी चित्रपटातील संवाद तसेच हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद असं हा माणूस आपल्याला व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय. त्याची हीच पद्धत नेटकऱ्यांना आवडली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Aniket Mishra (@aniketmishra194)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नेटकरी हा व्हिडीओ पाहून अतिशय खुश झाले असून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देत आहेत. तसेच लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअरसु्द्धा करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या व्हिडीओला aniketmishra194 या ईन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. सध्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

कमकुवत हृदय असणाऱ्यांनी व्हिडीओ पाहू नका, रात्री पाहाल तर…..

Video | बंदुकीच्या गोळीपेक्षाही जास्त वेग, सोडा बॉटलचे झाकण उघणाऱ्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल

Video | लहान मुलासारखी बकऱ्यांची मस्ती, उतारावर रंगला घसरगुंडीचा खेळ, व्हिडीओ व्हायरल

(man saying funny dialogue while playing dholak video went viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI